Shivsena : शिवाजीराव आढळराव पाटलांची हकालपट्टी का केली? मातोश्रीवरून आलेल्या उत्तराचा माजी आमदारांकडून खुलासा
Shivsena : शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार शरद सोनवणेंनी या बैठकीत शिरूर लोकसभेतील शिवसैनिक सहभागी झाले होते आहेत.
Sharad Sonawane : पुण्यात शिरुरमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात दाखल झालेले उपनेते शिवाजी आढळराव पाटलांनी (Shivaji Adhalrao Patil) बैठक घेतली. त्यामध्ये शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) ही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत शिरूर लोकसभेतील शिवसैनिक सहभागी झाले होते आहेत. बैठकीनंतर आढळराव आणि सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटलांची हकालपट्टी का केली? मातोश्रीवरून आलेल्या उत्तराचा माजी आमदारांनी खुलासा केला आहे. काय म्हणाले सोनावणे?
शिवाजी आढळराव पाटलांची हकालपट्टी का केली? माजी आमदार शरद सोनवणेंनी सांगितलं कारण
शरद सोनवणे म्हणाले, दोन आठवड्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटलांची हकालपट्टी करण्यात आली. ही बातमी राज्यभर पसरली. मग काही वेळाने ते पक्षातच आहेत, असं पत्रक काढण्यात आलं. पण तो पर्यंत त्यांची बदनामी झाली. त्याचं काय? अनेक राज्यातून शिवाजी दादांना फोन आले. का हकालपट्टी केली असे प्रश्न विचारले गेले. पण दादांकडे उत्तर नव्हतं. हाच प्रश्न आम्ही मातोश्रीवर विचारला, ते म्हणाले नजरचुकीने झालं. ठीक आहे आम्ही समजून घेतलं. मग पुढं कसं काम करायचं असा प्रश्न आम्ही विचारलं? त्यावर आम्हाला सांगण्यात आलं, की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घ्यावं लागेल आणि तुम्हाला पुणे लोकसभेतून लढावं लागेल. तशा तयारीला तुम्ही लागा. असे उत्तर मातोश्रीवरून आले.
आयुष्यात कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही - सोनावणे
यावेळी शरद सोनवणे यांनी शिवाजी आढळरावांना पुण्यातून लोकसभा लढविण्यास सांगितलं, तर राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा सोडून पुण्यातून लढायला सांगितलं. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हिंदुत्वाबद्दल आमचं प्रचंड प्रेम आहे. मात्र आम्ही आयुष्यात कधीच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नाही. आढळरावांना पाहून काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले. त्यांना मंचावर बोलावलं आणि आपण कुठं बाहेर गेलेलो नाही. त्यांनी सांगितलं की तुमचं उपनेते पद कायम आहे. त्यामुळं तुमच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. असंही सोनावणे यांनी यावेळी सांगितले.
हे सगळे ठाकरे गटाचेच - शरद सोनावणे
सोनावणे म्हणाले, कोणती शिवसेना खरी? असं विचारलं जातंय. आम्ही कोणत्या गटाचे असे प्रश्न विचारले जातायेत. तर शिंदे गट असो की उद्धव गट असो हे सगळे ठाकरे गटाचेच आहेत. हे ठाकरे म्हणजे एकमेव बाळासाहेब ठाकरे हाच गट आहे.