एक्स्प्लोर

Sanjay Raut Majha Katta Highlights : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोरांची मंत्रीपदं 24 तासांत जाणार, माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे

Sanjay Raut on Majha Katta : शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

मुंबई :  एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपदं 24 तासांमध्ये जातील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिलाय.  संजय राऊत  माझा कट्टयावर बोलत होते.  राजीनामा, बंडखोरी अशा अनेक मुद्द्यांवर बोलले आहे. जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार, मात्र उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच; संजय राऊतांच्या या मताशी सहमत आहात का?

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्व या गोष्टी फक्त तोंडी लावायला आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडाव्या म्हणून हे बंड करण्यात आले आहे. लालसा, महत्त्वकांक्षा, आमिष ही बंडाची सूत्र आहेत 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होण्यास भाजप जबाबदार आहे. 2019 साली भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यामुळे त्यांनी युती तोडली. ही गोष्ट एकनाथ शिंदेना  माहित आहे. जर 2019 साली भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंन  मुख्यमंत्री केले असते. 

बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपदं 24 तासांमध्ये  जाणार

बंडखोर मंत्र्यांची मंत्रीपदं 24 तासांमध्ये जातील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिलाय.. 16 आमदारांचं बंड ईडीच्या सुरु असलेल्या कारवाईमुळे आहे. स

शिवसेनेने ज्यांना घडवले त्यांनी बंड केले 

जे आमदार शिवसेनेतून निवडुन आले त्यांनी बंड केले. शिवसेनेने मेहनतीने या आमदारांना मोठे केले आहे. आज त्यांनी बंड केले. आज जे शिवसेनेच्या विचाराने निवडणूक लढवली. पुन्हा जनता या आमदारांना मतं देणार नाही

ईडीच्या केसेस 24 तासात क्लिअर 

ज्या आमदारांविरुद्ध किरीट सोमय्या रोज पत्रकार परिषद आहे. ज्यांच्या ईडीच्या कारवाया झाल्या, ते शिवसना सोडून गेले. कारण 24 तासात फडणवीसांनी त्यांच्यावरील कारवाया  24 तासात क्लिअर केले आहे. 

उद्धव ठाकरे  रुग्णालयात होते त्यावेळी बंडांची सुरूवात  

उद्धव ठाकरे ज्यावेळी रुग्णालयात होते त्यावेळी बंडांची सुरूवात केली होती. रुग्णालयातून बाहेर येण्याअगोदरच सत्ता उलटवण्याचा कट शिजत होता

आनंद दिघेंचे नाव घेऊन राजकरण करू नये 

एकनाथ शिंदे आनंद दिघेंचा अहवाला देतात. आनंद दिघेंचे नाव घेऊन राजकरण करू नये. आनंद दिघे हे बाळासाहेबांचे हनुमान होते.  

बंड केलेल्या आमदारांचा हिंदुत्वांचा काही संबंध नाही 

बंड केलेल्या आमदारांचा हिंदुत्वांचा काही संबंध नाही. लालसेपोटी हे आमदार गेले आहे. ईडीच्या केसेस लवकर कधी बंद होत नाही. सरकार येतात आणि जातात

सत्तेचा अमरपट्टा कोणीही बांधून आलेले नाही

सत्ता येते सत्ता जाते. कधीही सत्ता जाऊ शकते. सत्तेचा अमरपट्टा कोणीही बांधून आलेले नाही. केंद्रात देखील कधीही सत्तापालट होऊ शकतो. बहुमत कधीही स्थिर नसते. 

सत्तेत असल्यावर नैतिकता आणि तत्त्व बाजूला ठेवावी लागतात 

आत्मपरिक्षण हे सर्वांनी करणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी काळजीपूर्वक पाऊल टाकणे गरजेचे असते. सत्तेत असल्यावर नैतिकता आणि तत्त्व बाजूला ठेवावी लागतात. कुत्रा सोडला तर बेइमानी कोणीही करू शकतो, हे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मी बाळासाहेबांसोबत जवळून काम केले आहे. 

निधीवाटपचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना

आतापर्यंतच्या बंडाचा इतिहास आहे की ते पुन्हा निवडुन आलेले नाही. आता देखील जे आमदार शिवसेना सोडून गेले ते पुन्हा निवडुन येणार येणार नाही. निधी कमी मिळाला हे बहाना आहे.

एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील गेल्याचे दु:ख 

एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील गेल्याचे दु:ख झाले आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे काम केले. त्यांचा जन्म शिवसेनेतच झाला आहे.  एकत्र काम केलेले आमदार आज सोडून गेले याचे दु:ख झाले. एकनाथ शिंदे हे माझे जवळचे मित्र आहेत. 

पवार हे राजकरणातील भीष्म पितामह

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. राजकारण ही शरद पवारांची ऊर्जा आहे. ते थकलेले नाहीत. पवार हे अनुभवी  आहेत म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली.  महाविकासआघाडीतील प्रत्येक व्यक्ती हे सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

नवीन सरकार स्थापन होणार नाही

आमचे बहुमत सिद्ध होईल, हे जर मी म्हणत असेल तर ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. महाविकासआघाडील प्रत्येक व्यक्ती हे सरकर वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्ता वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या पातळीवर काम करत आहे. त्यामुळे हे सरकार पाडणे शक्य नाही. 

शिवसेना हा एक ब्रँड

शिवसेना हा एक ब्रँड आहे. अनेकांनी या अगोदर बंड केले. आम्हाला अशा बंडाची सवय आहे. आम्हाला अशा बंडाशी आम्ही लढलो आहे. आम्हाला असे बंड जिंकण्याची सवय आहे. 

उद्धव ठाकरेंवर राज्याची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी 

उद्धव ठाकरेंवर राज्याची आणि पक्षाची अशी दुहेरी जबाबदारी आली. मुख्यमंत्री असताना काही मर्यादा असतात. संवाद नाही ही चुकीची माहिती आहे. आमदारांचे म्हणणे ऐकून घ्यायची जबाबदारी एकनाथ शिंदेवर होते.आमदार, खासदार गेले म्हणून पक्ष जात नाही. 

एकनाथ शिंदेच्या हातातील वेळ निघून गेली 

शिवसेनेच्या पाठीवर अनेक वार झाले आहेच. ते पेलवण्याची जबाबदारी होती. बाळसाहेबांनी गद्दारांना कधी माफ केले नाही. एकनाथ शिंदेना अनेक संधी दिल्या. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, आता ती वेळ निघून गेली. जो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget