(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदं? ट्वीट करत एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde on Maharashtra Cabinet Ministry : भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसं असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
Eknath Shinde on Maharashtra Cabinet Ministry : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता भाजप आणि शिवसेना शिंदेगटाचं सरकार आल्यानंतर मंत्रीमंडळ कसं असेल याची आता चर्चा सुरु झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असं शिंदे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे.
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर
हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर
राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले