Maharashtra non teaching staff strike : राज्यातील विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; संपामुळे विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता
Maharashtra News: विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या.
Maharashtra News : मुंबई : बारावीच्या बोर्डाच्या (HSC Exam) परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. त्यातच राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारीच नसल्याने कॉलेज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे.
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आज अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारला आहे. बारावी प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना त्यासोबतच लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो.
Maharashtra Non Teaching Staff Strike : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
- महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
21 फेब्रुवारीपासून म्हणजे उद्यापासून बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने या संदर्भात तातडीने लक्ष घालून योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहिल्यास मोठा फटका लेखी परीक्षांना बसण्याची शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI