धक्कादायक! जिवंत असूनही तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या पुनर्वसन यादीत नावे, प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला
Tiware Dam : रत्नागिरी तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला तीन वर्षे झाले. मात्र, आजही ती काळरात्र ग्रामस्थांच्या मनात घर करुन आहे.
चिपळूण : ती काळ रात्र आमवस्येची..आठवण येताच क्षणांतच अंगावर काटा आणणारी घटना..2 जुलै 2019 चा तो दिवस.. एकीकडे वादळी वाऱ्यासह धोधो बरसणारा ढगफुटी सदृश्य पाऊस..थांबायचे नावही न घेता सतत पडल्याने चिपळूण तालुक्यातील तिवरे गावचे धरण ओव्हर फ्लो होऊन वाहूं लागले. रात्रीच्या वेळी रिमझिम पावसात धरण फुटले आणि क्षणांतच होत्याच नव्हतं झाले. धरण फुटल्याने वाहणाऱ्या वेगवान पाण्याच्या प्रवाहात बघता बघता धरणाशेजारील घरे वाहून गेली अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर त्यात काही जणांचा मृत्यूही झाला. त्यानंतर अनेक घडामोडींघडल्या अनेक राजकीय नेते,प्रशासकीय यंत्रणा घटना स्थळाला भेट दिल्या.यात मृत्यू झालेल्यांना काहीना घरें देण्यात आली तर काहीना अजून घरें देणे बाकी आहेत. राज्याला हादरवून टाकणारी पावणेदोन वर्षापूर्वीची ही घटना आहे. या दुर्घटनेत घरे वाहून गेल्यानंतर प्रशासनाकडून पुनर्वसन यादी तयार करण्यात आली.यात गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाने पडताळणी करुन मृतांची यादी तयार करण्यात आली.या यादीत आज पावणेदोन वर्षानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या यादीतील दोन महिला आणि एक पुरुष जिवंत असतांनाही त्यांची नावे मृत यादीत..त्यामुळे या यादीची चर्चा आता सगळीकडेच सुरु आहे.
एका गोठ्याच्या बदल्यात घर देण्याच्या प्रकारावरून दाखल असलेल्या अर्जावर चौकशी करतांना हा प्रकार उघडकीस आला आहे. फुटलेल्या या धरणात वाहणाऱ्या प्रवाहाच्या बाजूला असलेले 14 घरांसह गोठे जनावरांसह वाहून गेले.यात 22 जणांचा मृत्यूही झाला. दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून पंचनामा प्रक्रिया करण्यात आली.गावच्या ग्रामपंचायतीत असलेल्या रेकॉर्ड नुसार अ,ब,क,ड अशी वर्गवारी असलेली एकूण 42 घरांची नोंद सापडली.त्यावरून पुनर्वसनाची यादी तयार करण्यात आली.या यादीत मूळ कुटुंब मालक जिवंत असतांनाही मृत म्हणून यात नोंद करण्यात आली.प्रांताधिकारी यांच्याकडून प्राप्त यादीनुसार यातील 24 कुटुंबाना अलोरे येथील पुनर्वसन प्रकल्पात घरे बांधून देण्यात आली. ही घरे देतांना चिठ्ठ्या उडवून सोडत काढण्यात आली.त्यामुळे राहिलेल्या घरे कधी मिळणार या उत्सुकता यादीतील रहिवाशांना होती.अर्थातच ही घरे मिळवण्यासाठी चढाओढ होती. ज्यांना खरोखरच तात्काळ घरेंपाहिजे होती त्यांना ती मिळाली नाही.त्यामुळे यादी पुन्हां तपासण्यात आली.आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला..
आमची घरे धरण दुर्घटनेत वाहून गेली शिवाय घरातील व्यक्तीही यात मृत पावले..आम्हांला राहण्यासाठी घर नसल्यामुळे आम्ही सध्या भाडेतत्वावर खोल्या घेउन राहतोय आणि जे गावातील चाकरमानी कामानिमित्त मुंबईत राहतात सणासुदीला गावाला येतात यांना पहिल्या यादीत घरे मिळाली. पण आम्ही वर्षेभर गावाला राहूनही आम्हांला सध्या भाडे भरून रहावे लागतय.याचं आम्हांला दु:ख आहे.प्रशासनाने चिठ्ठी सोडत न काढता यादीतील लोकांची पडताळणी करुन त्यांना आवश्यकतेनुसार घरे द्यायला पाहिजे होती.
प्रांताधिकारी प्रवीण पवार म्हणाले, तिवरे ग्रामस्थांनी पुनर्वसन यादीतील हा धक्कादायक प्रकार आपल्या निदर्शनास आणून दिला आहे.याबाबत तहसीलदार यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.