राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती
सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांची मुलगी आणि मुलाचाही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांना कोरोनाची (corona ) लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि त्यांच्या मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) पादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचत कोरोनाच्या रूग्णांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
दरम्यान, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं नुकतचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड सोमवारी अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानंतर आता सुप्रीया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुप्रीया सुळे यांनी ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर 'ताई काळजी घ्या, ताई लवकर बऱ्या व्हा, अशा प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या आहेत. तर अनेक युजर्सकडून सुप्रीया सुळे यांचे हे ट्वीट रिट्वीट करण्यात आले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
OBC Reservation : संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? सुप्रिया सुळे यांचा सवाल
Delhi : लोकसभेत सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर रोख, म्हणाल्या ABP Majha