Salim Shaikh : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावे, सलीम शेख यांचे आवाहन
Salim Shaikh : राज ठाकरे (Raj Thackeray) कोणताही जातीधर्म न मानता जनतेसाठी काम करतात. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी जे राजीनामे दिले त्यांनी ते मागे घ्यावे.
![Salim Shaikh : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावे, सलीम शेख यांचे आवाहन Maharashtra News Raj Thackeray Salim Shaikh reaction Muslim office bearers should withdraw their resignations Salim Shaikh : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावे, सलीम शेख यांचे आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/c05231f23f586be6b6b95e274754f8ec_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : माझा नेता कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. महाराष्ट्रात वेगळं चित्र रंगवलं जात आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घ्यावेत असं आवाहन मनसे नेते सलीम शेख यांनी केलं आहे.
सलीम शेख म्हणाले, साहेबांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्याचे चित्र बदलले. प्रसारमाध्यामे आमची प्रतिक्रिया जाणून घेत होते. मनसेच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पक्षाचा राजीनामा कोणी दिलेला नाही. राज ठाकरे कोणताही जातीधर्म न मानता जनतेसाठी काम करतात. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी जे राजीनामे दिले त्यांनी ते मागे घ्यावे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर सोशल मीडियांच्या माध्यमातून माझे चुकीचे चित्र रंगवण्यात आले आहे. माझा डीएनए तपासण्याचा प्रयत्न केला. माझा डीएनए काय आहे? असा सवाल विचारण्यात आला होता. आज मी माझी भूमीका स्पष्ट करणार आहे. जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माझ्यामध्ये डीएनए आहे असं मनसे नेते सलीम शेख म्हणाले.
सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत मुस्लीम बांधवांची नाराजी ओढवून घेती होती. नाशिकसह इतर जिल्ह्यातील मनसेच्या मुस्लीम नेत्यांनी राजीनामा दिला. परंतु सलीम शेख यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं. यानंतर सलीम शेख यांचा निषेध करणारे फलक लावण्यात आले. शिवाय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेरमधील तरुण आणि सलीम शेख यांच्यातील संवादाची ही ऑडिओ क्लिप असून संबंधित तरुण त्यांना तुम्ही मुस्लीम असूच शकत नाी, डीएनए टेस्ट करुन घ्या, असा सल्ला दिला होता. त्यामुळे आजच्या उत्तर सभेत सलीम शेख काय यांनी उत्तर दिले
संबंधित बातम्या :
Raj Thackeray : मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय, मग राज साहेबांच्या हातात राज्याची सत्ता दिली तर...; वसंत मोरेंचे विश्वास
MNS leader Vasant More : राज ठाकरेंचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत कृष्ण मोरे कोण? त्यांची कारकीर्द काय?
Raj Thackeray : ठाण्यात थोड्याच वेळात 'राजगर्जना', लाव रे तो व्हीडिओच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)