Nashik ZP : काय अभियान, काय स्पर्धा, काय विषय...नाशिक जिल्हा परिषदेची अनोखी स्पर्धा
Maharashtra Nashik News: नाशिक जागतिक शौचालय दिनानिमित्त सेल्फी विथ टॉयलेट (Selfie With Toilet) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Maharashtra Nashik News : घर म्हटलं कि शौचालय (Toilet) हवंच, मात्र शहरासह ग्रामीण भागातील आजही परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. एकीकडे शासन हागणदरीमुक्त गाव अशी संकल्पना राबवत असताना दुसरीकडे मात्र आजही अनेक भागात शौचालय नसल्याचे समोर आले आहे. अशातच नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हयात अनोख्या स्पर्धेचे आयोजण केले आहे. येत्या 19 नोव्हेंबर ला जागतिक शौचालय दिनानिमित्त (World Toilet Day) सेल्फी विथ टॉयलेट (Selfie With Toilet) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक शौचालय दिनाचे (World Toilet Day) औचित्य साधून युनिसेफ आणि सी. वाय. डी. ए. पुणे, यांच्या संयुक्तः विद्यमाने राज्य स्तरीय स्वच्छ शौचालय अभियान राबविण्यात येत आहे. याच निमिताने वर्ग चौथी ते दहावीच्या मुलामुलींसाठी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) या दिनाच्या औचित साधून युनिसेफ (UNICEF) आणि सीवायडीए पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छ शौचालय अभियान राबविण्यात येत आहे. त्यांनी वर्ग चौथी ते दहावीच्या मुला-मुलींसाठी विविध स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या स्पर्धांचा निकाल 19 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यभरातन आलेल्या स्पर्धकांमधून जाहीर होणार असल्याचे जिल्हा परिषदेने सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेने (Maharashtra Nashik Zilla Parishad News) देखील आवाहन केले असून आपल्या गटातील सर्व माध्यमातून शाळेच्या इयत्ता चौथी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचना देण्यात येऊन सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान दरम्यान जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या (Maharashtra Nashik Zilla Parishad News) माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये पथनाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, टॉयलेट विथसेल्फी स्पर्धा. माझी शाळा माझे शौचालय, शौचालय वापरण्याच्या योग्य पद्धती व मलमूत्र व्यवस्थापन, माझी शाळा, माझे सुरक्षित शौचालय, शौचालय वापरण्याचे योग्य व आरोग्यदायी पद्धती, माझ्या स्वप्नातील शौचालय, शौचालयसह सेल्फी, स्वच्छ व आरोग्यदायी शौचालयास व थीम अनुसरूनअसणार आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात होणार असून यांचा निकालही ऑनलाईन लागणार आहे.
Maharashtra Nashik Zilla Parishad News : टॉयलेट विथ सेल्फी स्पर्धा
दरम्यान जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेकडून अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सेल्फी विथ टॉयटॉयलेट सह सेल्फी स्पर्धेचा विषय स्वच्छ आणि आरोग्यदायी टॉयलेट्स सेल्फी असून या स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये टॉयलेट्स सेल्फी पाठवताना विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव, शाळेचे, केंद्राचे नाव, तालुका, जिल्ह्याचे नाव आणि संपर्क क्रमांक नमूद करावयाचा आहे. पर्यावरण पूरक सजावट करून शौचालयाच्या घरातील शाळेतील किंवा वस्तीतील टॉयलेट सेल्फी काढून पाठवायचा आहे. सेल्फी चा फोटो व्यवस्थित काढून पत्रकात दिलेल्या क्रमांकावर पाठवायचा आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्पर्धाचे आयोजन केले आहे.