(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sabhajiraje Chatrapati : संभाजीराजेंच्या जीविताला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची नाशिक मराठा क्रांती मोर्चाची मागणी
Sabhajiraje Chatrapati : संभाजी राजेंच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सुरक्षेत वाढ करून द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने करण्यात आली आहे.
Sabhajiraje Chatrapati : संभाजीराजे छत्रपती (Sabhajiraje Chatrpati) यांनी मराठीतील दोन चित्रपटांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट सृष्टीवर माफिया अंडरवर्ल्डमधील गुंडांचा वरचष्मा असल्याने संभाजी राजेंना धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षित वाढ करून द्यावी अशी नाशिक (Nashik) सकल मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatarpati Shivaji Maharaj) संदर्भातली इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले आले. अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहात वादही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या चित्रपटांविषयी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीत सुरक्षा वाढवून देण्याची मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी छत्रपतींचे वारस संभाजी राजे यांनीही या चित्रपटाचे निर्मितीवर आक्षेप घेऊन चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. याबाबत नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने एका पत्राद्वारे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे कि,चित्रपट सृष्टीवर माफीया अंडरवर्ल्ड मधील कुख्यात गुंडाचा वरचष्मा आहे. त्यांच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या मंडळीविरुद्ध प्राणघात कट रसून अमलातही आणले जातात. हा इतिहास नजरसमोर असल्याने छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजी राजे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे छत्रपतींना सध्या असलेले वाय प्लस दर्जाचे संरक्षणाऐवजी झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात कुणी आवाज उठविण्याच्या किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील सकल मराठा क्रांती मोर्चाने पत्रकाद्वारे दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पाहता संभाजीराजे छत्रपती यांच्या सुरक्षेत वाढ करावी ही मराठा समाजाची मागणी मान्य करून उपमुख्यमंत्री यांनी याबाबत विचार करावा असे विनंती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले...
ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे. तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे.हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवायचं? सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?' असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 'चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना मी सांगू इच्छितो, जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे.