एक्स्प्लोर

Nashik BJP Protest : काँग्रेसनं 'तो' व्हिडीओ डिलीट करावा, अन्यथा...; नाशिकमध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन 

Nashik BJP Protest : 'एक-एक करून सगळे गड जिंकायचेत, सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचे आहे'.

Nashik BJP Protest : काँग्रेस पक्षाच्या (Congress) सोशल मीडिया हॅण्डलवरून एका व्हिडिओ प्रसाराची (Viral Video) करण्यात आला असून या व्हिडीओवरून राजकारण तापले आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून आता नाशिक (Nashik) शहरातील भाजप पक्षाने देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आज सकाळी रविवार कारंजा परिसरात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 

अलीकडेच कर्नाटक निवडणुकीतील काँग्रेसचा विजयानंतर काँग्रेसवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशातच राहुल गांधी यांनी ट्रकद्वारे प्रवास करत चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. याच दरम्यान काँग्रेस पक्षाने (Congress) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींच्या एका रॅलीचा हा व्हिडिओ असून ते जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) शौर्यगाथेवरील गाणं बॅकग्राउंड म्युजिक म्हणून वापरण्यात आले आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपने (BJP) या व्हीडिओवर आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ तत्काळ डिलीट करून काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे. 

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरून व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर राहुल गांधीची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान 'एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचे आहे', असं कॅप्शनही या व्हीडिओला देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसपक्ष आणि राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी रविवार कारंजा परिसरात भाजपा आणि युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकानी कपाळावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. संबंधित व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच कॉंग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

नाना पटोले काय म्हणाले? 

भाजपच्या या आरोपांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन चालणं जर भाजपच्या दृष्टीने योग्य नसेल. तर काँग्रेस पक्ष शिवरायांचा विचार महाराष्ट्रासह देशात रुजवण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे, असं नाना पटोले म्हणाले. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही नाना पटोले यांनी टीका केली आहे. काळी टोपी घातलेली भगतसिंग कोश्यारी नावाची व्यक्ती शिवरायांबद्दल जे बोलली ते भाजपला मान्य आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget