एक्स्प्लोर
BJP On Rahul Gandhi Tweet : काँग्रेसनं ट्विट केलेल्या व्हिडीओवर भाजपचा संताप
काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विट केलाय... पण या व्हिडिओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं.... आणि राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप भाजपने केलाय. काँग्रेसनं ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतलाय. व्हिडिओ तातडीनं डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीए.. शिवाय काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी असंही भाजपनं म्हंटलंय... त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे....
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















