Nashik-Mumbai Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील खड्डयांवरून नाशिकमध्ये राजकारण, भुजबळ-भुसे आमनेसामने
Nashik-Mumbai Highway : नाशिकमध्ये (Nashik) मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) खड्डयांवरून राजकारण चांगलंच तापल आहे.
Nashik-Mumbai Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) खड्डयांवरून सध्या नाशिकमध्ये (Nashik) राजकारण चांगलंच तापल आहे. खड्डे तात्काळ बुजवा नाहीतर, आंदोलनाचा ईशारा माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे तर खड्डयांबाबत प्रशासनाला आधीच सूचना दिल्याचं पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी म्हंटल आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या या राजकारणात एक गोष्ट चांगली म्हणावी लागेल ति म्हणजे धुळे ते पडघा हे 270 किलोमीटरचे रस्ते 6 नोव्हेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. हे आश्वासन आता खरच पूर्ण होणार का? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई - आग्रा महामार्ग.. हा महामार्ग नेहमीच काहीना काही कारणास्तव चर्चेत असतो. कधी टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी, कधी महामार्गावर होणारे अपघात आणि याही पेक्षा अधिक चर्चेत असतो तो खड्डयांमुळे. सरकार कुठलेही असो या महामार्गावर फक्त पावसाळ्यातच नाही तर जवळपास बाराही महिने खड्डे कायम असतात, नागरिकांसोबतच अनेक राजकीय पक्षांनी खड्ड्यांवर अनेक वेळा आवाज उठवला आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकलेला नाही आणि याच मुद्द्यावरून सध्या नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भूसे आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार राजकारण रंगले आहे. 06 नोव्हेंबर पर्यंत खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा ईशारा भुजबळांनी दिलाय तर खड्डयांबाबत प्रशासनाला आधीच सूचना दिल्याचं भुसे यांनी म्हंटल आहे. NHAI वाले सध्या तात्पुरती डागडुजी करत आहेत, पूर्ण रस्त्याची रीसरफेसिंग करायला हवे. NHAI ने पाच वर्षांपूर्वी हे काम नीट केले नाही. गडकरी साहेबांनी सिमेंटचे रस्ते एकूण 5 हजार कोटीचे काम करू सांगितले होते पण तुम्ही अजून काही केले नाही. टोल बंद केला तर नंतर तो दोन दिवस वाढवून घेतात. 6 तारखेपर्यंत काम नाही झाले तर ठेकेदारांकडेही आम्ही प्रेमाने जाऊ, असा खोचक टोला माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
महापालिका, PWD आणि NHAI सर्व अधिकाऱ्यांना रस्ता डागडुजी बाबत सूचना दिल्या आहेत. काम करतांना पाऊस आल्यामुळे रस्ते परत खराब झाले होते पण आता लवकर दुरुस्त होतील. अधिकाऱ्यांना चांगल्या भाषेत सांगितले आहे. टोल देऊन आपण रस्त्याचा वापर करतोय, वेळ पडल्यास टोल बंद करण्यापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यंत विषय नेऊ. भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, मोठा अनुभव आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्या सुचनांचे स्वागत असल्याचे पालकमंत्री दादा भूसे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे पाऊस आणि दिवाळीच्या सुट्टीमुळे खड्डे भरण्यास उशीर झाला. पुढील सहा दिवसात सर्व रस्ते आपण खड्डेमुक्त करून टाकू. मुंबई आग्रा महामार्गावरील पडघा ते धुळे असे काम करू अशी माहिती NHAI चे प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब साळुंखे यांनी दिली आहे.
दरम्यान भुजबळ हे अजूनही पालकमंत्र्यांच्याच भूमिकेत असून दोनच दिवसांपूर्वी त्यांनी NHAI च्या सर्व अधिकाऱ्यांना भुजबळ फार्मवर बोलवून घेत त्यांना धारेवर धरले होते. भुजबळांनी आंदोलनाची हाक देताच धुळे ते पडघा हे 270 किलोमीटरचे रस्ते 6 नोव्हेंबर पर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. पडघा ते धुळे असे 270 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे आम्ही बुजवू असे NHAI चे अधिकारी सांगतायत. सध्या महामार्गावर अनेक ठिकाणी हे कामं देखिल सुरू आहे. मात्र ही तात्पुरती डागडुजी असून बिसी मिक्स टाकून हे खड्डे बुजवले जातायत. पाऊस पडल्यास पुन्हा खड्डे डोकं वर काढतील यात शंका नाही. खरच 6 नोव्हेंबरपर्यंत बुजवले जाणार का ? पडघा ते धुळे या दोन्ही मार्गावरील रस्ते हे खरच खड्डेमुक्त होणार का?
पालकमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून दादा भूसे हे ऍक्शन मोडवर आलेले नाहीत आणि हिच संधी साधत छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत, अधिकाऱ्यांना थेट भुजबळ फार्मवर बोलवून त्यांच्या ते बैठका घेत असल्याने भुजबळ हेच पालकमंत्र्यांची जणू भूमिका बजावत असल्याचा भास नाशिककरांना होतोय. भुजबळ साहेब खड्डे महाविकास आघाडीच्या काळात नव्हते का? असा देखिल प्रश्न उपस्थित असून भविष्यात या दोघांच्या राजकारणात फक्त नाशिकचा विकास रखडू नये म्हणजे झालं..