Nashik News : आईची 'माया' आटली! नाशिक महापालिकेच्या घंटागाडीत आढळले नवजात अर्भक
Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेच्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पातील (Dumping Ground) कचऱ्यात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली.
Nashik News : नाशिक (Nashik) महापालिकेच्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पातील (Dumping Ground) कचऱ्यात मृत स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली. या अर्भकाला एका पिशवीत गुंडाळून ते घंटागाडीत टाकण्यात आले होते. नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वैद्यकीय पथकाने अर्भकाची पाहणी केली असता ते 30 ते 32 आठवड्यांचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वतीने इंदिरानगर पोलिसात (Nashik Police) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिक मनपाच्या घंटागाड्या दररोज सहा विभागांच्या माध्यमातून फिरत असतात. दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता एका घंटागाडीतून आलेल्या कचऱ्याचे कचरा वेचक हे विलगीकरण करत असताना त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत कापडात काहीतरी वस्तू गुंडाळलेली दिसली. पिशवी उघडली असता त्यात अंदाजे एका दिवसाचे मृत स्त्री जातीचे अर्भक असल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्या महिलेने खत प्रकल्पावरील अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड यांना या घटनेची माहिती दिली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्माला आले असावे असा संशय असून पोलीस मातेचा शोध घेत आहे.
दरम्यान नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. प्रशांत शेटे, बालरोग तज्ञ डॉ. विनोद पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिक महापालिकेच्या पथकाने तपासणी केली असता सदरचे स्त्री अर्भक हे 30 ते 32 आठवडे यांचे असून 24 तासांच्या आतच जन्माला आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर अर्भक पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. तर या प्रकरणी मनपाचे घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड म्हणाले कि, 'खत प्रकल्पावर कचरा बिलगरीकरण करताना कचरावेचकाला एका पिशवीत मृत श्री जातीच्या रूप काढून आले आहे, कोणीतरी कचरा टाकताना घंटागाडी सदरच्या गाडीत टाकल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन
शुक्रवारी सकाळी 11 ते 12 वाजता पंचवटी आणि नाशिक पूर्व या विभागातून आठ ते दहा घंटे गाड्या इथे आल्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. त्यात कचऱ्याच्या वर्गीकरणावरून सदर अर्भक हे नाशिक पूर्व विभागाच्या घंटागाड्यांमधून आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. सदरचे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आल्याचा संशय असून घरीच प्रसूती झाल्याचा संशय आहे. जन्मानंतर ओळख लपवण्यासाठी ते पिशवीत गुंडाळून घंटागाडी टाकले असण्याची शक्यता आहे. सर्व डॉक्टर्स, नर्सिंग होम यांना काही माहिती असल्यास त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.