एक्स्प्लोर

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार पहिल्यांदा नाशिकमध्ये, शिंदे गटाच्या दोन शिलेदारांची गुवाहाटी दौऱ्याला दांडी!

Abdul Sattar : गुवाहाटीला न जाता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत. 

Abdul Sattar : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह इतर आमदार गुवाहाटी (Guvahati) दौऱ्यावर जात असताना मात्र कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे मात्र नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज ते शहरातील कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक शहरात आले आहेत. त्याचबरोबर गुवाहाटी दौऱ्यावर जाणार नसल्याने त्यांच्या गैरहजेरीची चर्चा आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीला (Guwahati) जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदार मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. आमदारांसह खासदारही गुवाहाटीला जाणार आहेत. तिथे जाऊन सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे महत्वाचे शिलेदार अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. 

काल सायंकाळी उशिरा अब्दुल सत्तार नाशिकमध्ये दाखल झाले असून आज ते नाशिकच्या कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनात ते परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शन भेटीनंतर सत्तार हे सिल्लोड मतदारसंघाकडे रवाना होणार आहे. मात्र दरवेळी आघाडीवर असणारे अब्दुल सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार नसल्याने गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यानंतर सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

गुलाबराव पाटीलही गैरहजर 
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात  आहेत. मात्र मंत्री अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर असल्याने गुवाहाटीला जाण्याची शक्यता कमी आहे तर दुसरीकडे गुलाबराव पाटील देखील जाणार नसल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे गुवाहाटीला जाणार नसल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. 

सत्तार पहिल्यांदा नाशिकमध्ये 
दरम्यान सत्ता स्थापनेनंतर राज्याच्या कृषिमंत्री पदी अब्दुल सत्तार हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार हे नाशिक शहरातील आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनात सहभागी होणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget