(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली, अशांना उत्तर देऊन काय फायदा? देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : बारसू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
Devendra Fadnavis : 'किमान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अभ्यास करून बोलतील, भाषण ऐकून बोलतील. मात्र आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली असून आणि ज्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे, ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय? अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
विधानसभेत बारसू प्रकरणावर (Barsu Refinery) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट (Tweet) करत 'नाणार असो की बारसू असो... भाजपा (BJP) महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतं' असल्याचे ते म्हणाले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, किमान आदित्य ठाकरे यावर अभ्यास करून बोलतील, असे वाटलं होत, मात्र आदित्य ठाकरे यांनी डोळ्यांनी पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे, अशांना उत्तर देऊन फायदा तरी काय? असं फडणवीस म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या (Nashik MPA) दीक्षांत सोहळ्यास ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्ट म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे म्हटलेलं आहे, ते अयोग्य आहे. उच्चपदस्थ लोकांनी असं का म्हणू नये, याबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचा समाधान आहे की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगलं आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट असे चालू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी सामना वाचत नाही
सामनामधून (Samana) भाजपावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले 'मी सामना वाचत नाही'. तर विधानभेत औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) देखील भाष्य केले. यावर फडणवीस म्हणाले की, विधानसभेत औरंगजेब या विषयावर चांगली चर्चा झाली असून यावर आता कुणाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच या अधिवेशनातून जनतेला काय काय मिळालं. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत मिळाली, मोदी आवास योजनेचा अनेकांना लाभ मिळाला, अनेक विधेयक मंजूर करण्यात आली.
देशातील सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म
महाराष्ट्र पोलीस दल देशातील अतिशय प्रशिक्षित अतिशय शिस्तबद्ध असं पोलीस दल आहे. देशामध्ये आपल्या पोलिस दलाचा एक मोठा नावलौकिक आहे जी काही नवीन युगाची आव्हान काय आहेत, आर्थिक गुन्हेगारी याबाबतची प्रशिक्षण पोलिसांना देत आहोत. नवीन युगाची आव्हाने पेरण्याकरता आपलं पोलीस दल सज्ज असणार आहे देशातला सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करत असून आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया बँकिंग सेक्टर नॉन बँकिंग संघटना असतील सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या आर्थिक संस्था असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या माध्यमातून सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढता येणार असल्याचं विश्वास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
इतर संबंधित बातम्या :
Devendra Fadnavis On Barsu Protest : आरे असो वा बारसू...यामध्ये आंदोलन करणाऱ्या एकाच व्यक्ती असून त्यांना परराज्यातून फंडिंग होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. तर , आंदोलकांनी हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले.