Nashik Marathi Bhasha Din : नाशिकमध्ये मराठीचा जयजयकार, ग्रंथदिंडीसह दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल
Nashik Marathi Bhasha Din : नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Nashik Marathi Bhasha Din : कवी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर (Kusumagraj) यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) म्हणून साजरा केला जात असून या निमित्ताने आज नाशिक शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी आबाल वृद्धांसह प्रशासकीय अधिकारी, महिलानी यावेळी ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. याचबरोबर आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. आज नाशिक (Nashik) शहरात भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रंथ दिंडी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघून पुढे कालिदास कला मंदिर येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. दरम्यान नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी व महानगरपालिका, आणि सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कालिदास कलामंदिर नाट्यगृहात ग्रामगीता, परिसंवाद, गझल संमेलन, निमंत्रितांचे कवी संमेलन अशा दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यिकांची गप्पा रंगणार
नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रमुख कार्यक्रमाला 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान सार्वजनिक वाचन वयाच्या वतीने बाल साहित्यिक मेळावा औरंगाबाद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. अक्षरबाग बाल साहित्य मेळाव्याचे आयोजन साडेदहा वाजता होणार असून सकाळी 11 वाजता नाट्यछटा स्पर्धा दुपारी दीड वाजता साहित्यिकांची गप्पा रंगणार आहे. यात आबा महाजन, राज शेळके, चिदानंद फाळके, चैत्र हुदलीकर, तृप्ती चावरे-तिजारे व बबन शिंदे यांचा सहभाग असणार आहे.
असे होणार आज विविध कार्यक्रम
सकाळी साडे सात ते साडे नऊ ग्रंथदिंडी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार 'ग्रामगीता' सादर करतील. दुपारी साडे बारा वाजता 'भाषा बदलते की बिघडते या विषयावर परिसंवाद, अध्यक्ष म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील. वक्ते डॉ. राम कुलकर्णी, अहिरे, प्राजक्त देशमुख, प्रशांत केंदळे, संदिप जगताप, राजेंद्र उगले, कविता गायधनी, सुरेश पवार, तुकाराम धांडे, विशाल टलें, गोरख पालवे, रविंद्र देवरे, देविदास चौधरी आणि संतोष हुदलीकर यांची उपस्थिती. सायंकाळी साडे पाच वाजता : गझलसंध्या. अध्यक्ष गझल अभ्यासक पोलिस डॉ. अरुण ठोके, प्रा. डॉ. शंकर अधिकारी सुनिल कडास व बोऱ्हाडे व किरण सोनार. दुपारी गौरवकुमार आठवले. उपस्थिती साडे तीन वा. : कवीसंमेलन होईल. आकाश कंकाळ, राधाकृष्ण अध्यक्ष ऐश्वर्य पाटेकर. प्रा. गंगाधर साळंके आदी.