Nashik Grampachayat Election : नाशिकमध्ये पुन्हा 177 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, असा आहे निवडणूक कार्यक्रम
Nashik Grampachayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Nashik Grampachayat Election : काही दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायत (Grampachayat Election) निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता पुन्हा सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल सात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींची (Grampanchayat Election) रणधुमाळीचा गुलाल उतरला नही तोच, आता पुन्हा जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. 177 ग्रामपंचायत निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 34 जिल्ह्यातील 340 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित व समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या अशा सुमारे सात हजार सातशे 51 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision) राज्यातील 340 तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 177 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये इगतपुरी २, कळवण 16, चांदवड 35, त्र्यंबक 01, दिंडोरी 6, देवळा 1३, नांदगाव 15, नाशिक 14, निफाड 20, पेठ 1, बागलाण 41, मालेगाव 13, येवला 7, सिन्नर 12
अशा एकूण 177 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. बुधवारी निवडणुक कार्यक्रमाची अधिसूचना प्रसिद्ध झाली. त्यानंतर २८ नोव्हेंबरपासून ०२ डिसेंबर पर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमध्ये 194 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपलेली असताना आता पुन्हा नाशिक जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायतसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. 27 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होणार असून अचानक आलेल्या निवडणूक कार्यक्रमांमुळे इच्छुकांची चांगलीच धावपळ उडणार आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज करू शकणार आहेत. येथे 02 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
दरम्यान 28 नोव्हेंबरपासून 02 डिसेंबर पर्यंत या काळात इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. तर 07 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिवस राहील. तर 18 डिसेंबरला मतदान होऊन 20 डिसेंबरला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी 02, कळवण 16, चांदवड 35, त्र्यंबक 01, दिंडोरी 06, देवळा 13, नांदगाव 15, नाशिक 14, निफाड 20, पेठ 1, बागलाण 41, मालेगाव 13, येवला 7, सिन्नर 12 या एकूण 177 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.