(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : दिंडोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू, तिघांच निलंबन, वणी पोलिसांत गुन्हा दाखल
Nashik News : दिंडोरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापक, वर्गशिक्षकासह अधीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे.
Nashik News : दिंडोरी तालुक्यातील (Dindori) जोपुळ येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर कुटुंबियानी संताप व्यक्त संबधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार शाळेतील मुख्याध्यापक, वर्गशिक्षकासह अधीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच वणी पोलिसांत घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रम शाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संकेत ज्ञानेश्वर गालट असे विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्यास दोन दिवसांपासून खोकला असल्याचे शाळा प्रशासनांकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यास नजीकच्या खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथून पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र संबंधित मयत मुलाचा मोठा भाऊ देखील याच शाळेत शिकत असून मयत संकेत हा गेल्या 13 दिवसांपासून आजारी असल्याचे त्यांने सांगितले. मात्र या संदर्भात किंचितशी माहिती ही कुटुंबीयांना मिळाली नसल्याचे गालट कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान पेठ (Peth) तालुक्यातील सावरणा येथील संकेत गालक हा मुलगा इयत्ता सहावीत शिकत होता. गेल्या दहा-बारा दिवसांपासून तो आजारी असल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले यादरम्यान त्याचे चेहऱ्यावर सूज देखील आली असता तरीदेखील तो वर्गात बसून शिकत होता मात्र याकडे सरास दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले अशातच 13 तारखेला या विद्यार्थ्यास खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करता घेऊन गेले त्यानंतर पुन्हा त्यास निवासी शाळेत घेऊन आले. मुलगा तेरा दिवसांपासून आजारी असताना एकदाही शाळा प्रशासनाने कुटुंबीयांना कळवल्या नसल्याचा आरोप मुलाच्या घरच्यांनी केला आहे. शेवटी ज्या दिवशी मुलाचा मुलाचे निधन झाले त्या दिवशी देखील उशिरा गालट कुटुंबीयांना कळविण्यात आल्याचे नातलगांचे म्हणणे आहे.
शाळेतील तिघांचे निलंबन...
दरम्यान या प्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने देखील निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार शाळेत आश्रम शाळेतील मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधीक्षक एकनाथ दाजी भामरे यांच्या निष्काळजीपणामुळे संकेत गालट याला देऊ गमवावा लागला. गेले पंधरा दिवस संकेत आजारी असतानाही त्याला रुग्णाला दाखल करण्यात आले नाही. वेळी उपचार मिळाले असते. तर संकेताजी वाचला असता या प्रकरणी तिघांच्या संस्थेने तात्काळ निलंबन केले असून त्यांच्या मान्य मान्यतेची प्रस्तावय अप्पर आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.