एक्स्प्लोर

Nashik News : लाचखोर सुनीता धनगर यांच्या एकाच बँक खात्यात 12 लाखांची रक्कम, इतर बँक खात्यांचा तपास सुरुच 

Nashik News : मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांच्या घरासह बँक लॉकर्सची झाडाझडती सुरु आहे.

Nashik News : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांच्या घरासह बँक लॉकर्सची झाडाझडती सुरु आहे. धनगर यांच्या पहिल्याच बँक खात्यातून तब्बल बारा लाख 71 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. यापूर्वीच त्यांच्या घरातून 85 लाख रुपयांसह 32 तोळे सोने हस्तगत करण्यात आले होते. अद्यापही दोन बँक खात्यांसह लॉकरची तपासणी सुरु असल्याने धनगर यांच्याकडे आणखी किती धन असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) कारवाईची धडक मोहीम सुरूच आहे. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास तीस लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. अशातच नाशिक मनपाच्या (Nashik NMC)  शिक्षण विभागातून शिक्षणाधिकारी सुनीता धनगर पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर संशयित लाचखोर सुनीता धनगर यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकाला तब्बल 85 लाख रुपयांची रोकड आणि 32 तोळ्यांचे दागिने सापडले होते. यात आता स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या खात्यातुन जवळपास 12 लाख 71 हजार रुपयांची हस्तगत करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य बँक खात्यांसह इतर मालमत्तांचीही तपास पथकाकडून चौकशी सुरु आहे.

नाशिक शहरासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये सध्या लाचखोरी आणि भ्रष्टाचार बोकाळला असून, दर आठवड्याला वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात एक मासा अडकत असल्याचे दिसून येत आहे. अशा लाचखोर कर्मचाऱ्यामुळे शासकीय कार्यालयांची प्रतिमा मलीन होत असून वर्ग-3 किंवा 4 सह आता चक्क वर्ग-1 व 2 चे अधिकारीही लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या हाती लागत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना 30 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर मनपाच्या शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी संशयित सुनीता धनगर यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पदकाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. 

लाचखोरी आणि भ्रष्टाचार बोकाळला.... 

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अशा धाडसी कारवायांमुळे विविध विभागातील शासकीय अधिकान्यांच्या लालफितीच्या दिरंगाईने त्रस्त नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेऊ लागले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रारीचा पाऊस पडत असतानाही प्रत्येक आठवड्यात निर्ढावलेल्या व्यवस्थेतील नवा लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी सामान्य नागरिकांकडे लाच मागण्याचे आणि स्वीकारण्याचे धाडस करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान न्यायालयाने धनगर यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अन्य बँकांच्या लॉकर्स, बँक खाते याविषयी अजूनही एसीबीचा तपास सुरु असल्याने एसीबीकडून त्यांची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्यता आहे.

एसीबीकडून झाडाझडती सुरुच 

लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या बँक आणि मालमत्तांची एसीबीकडून झाडाझडती सुरु असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात आढळली 12 लाख 71 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आणखी दोन बँक खात्यांची चौकशी केली जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना दोन दिवसांपूर्वी 50 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. धनगर यांच्या घरातून तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोने हस्तगत करण्यात आले होते. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून धनगर यांनी अजून किती माया गोळा केली आहे? हे समोर येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde : एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल, शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठकMahayuti Oath Ceremony BJP T Shirt : शपथविधीसाठी 'एक हैं तो सेफ है'चे खास टीशर्टBJP Ministers List : शपथविधीला अवघे काहीच; भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Embed widget