एक्स्प्लोर

Nashik News : बापरे! नाशिकमध्ये पाच वर्षांत दहा हजार घटस्फोट, निम्मे घटस्फोट फक्त मोबाईलमुळे... !

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील मागील पाच वर्षांतील घटस्फोटाची (Divorce) आकडेवारी हादरवून टाकणारी आहे.

Nashik News : लग्न (Marriage) म्हटलं कि दोन जीवांचं मिलन. शिवाय या दोन जीवांमुळे दोन कुटुंब देखील एकत्र येतात. संसाराला सुरवात होते. मात्र अलीकडच्या काळात लग्न जुळवणं मुश्किल तर तुटणं एकदम सोप्प झाला आहे. याच ताज उदाहरण म्हणजे नाशिक (Nashik) जिल्ह्यांतील मागील पाच वर्षांतील घटस्फोटाची (Divorce) आकडेवारी कुटुंब व्यवस्थेला हादरवून टाकणारी आहे. जवळपास दहा हजाराहून अधिक जोडप्यांचा काडीमोड झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. 

असं म्हटलं जात कि, कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीचा पाया म्हणून ओळखली जाते, तर लग्न म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा कणा असतो. मात्र गेल्या काही वर्षात हा कणा ढासळू लागला आहे. आपल्या बोलण्यातून सहजरित्या शब्द बाहेर पडतात कि, समाजात काडीमोड वाढलेत. महत्वाचं म्हणजे आता हि गोष्ट गांभीर्याने घेणं आवश्यक बनलं आहे. कारण नाशिक शहराचा विचार करता दिवसेंदिवस घटस्फोटांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर कौटुंबिक न्यायालयात गेल्या पाच वर्षांमध्ये दाखल दाव्यांची माहिती घेतली असता तब्बल 10 हजार 14 दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या दाव्यांची आकडेवारी पाहता घटस्फोट मिळवण्यासाठीचे दररोज सुमारे 15 दावे दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक शहरात दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे यामध्ये पती-पत्नीच्या आईचा हस्तक्षेप, सोशल मीडिया व व्यसनाधीनता अशी कारण समोर आली आहेत. हल्लीच्या मुलींमध्ये मोबाईलचे व्यसन कमालीचे दिसून येते. त्यातून काम, मुलं, कुटुंब यापेक्षा मोबाईलला अधिक वेळ दिला जातो. यातूनच कौटुंबिक वाद निर्माण होतात. शिवाय वादातून पतीची व्यसनाधीनता वाढते. परिणामी वाद विकोपाला जातात. मग शेवटी घटस्फोटावर गाडी येऊन थांबते, असही समुपदेशकांचे म्हणणे आहे.

मोबाईल वापरामुळे काडीमोड
नाशिकच म्हटलं तर 50 टक्के घटस्फोट हे मोबाइल मुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या डिजिटल युग असल्याने प्रत्येकाला मोबाईल हवा असतो. आता घरात पती पत्नी एकत्र राहत असले तरीही प्रत्येकाला स्वतंत्र मोबाईलची आवश्यकता असते. यातून पती पत्नी मध्ये संवाद कमी होणे. मुलांना वेळ न देणे. तासंतास मोबाईलमध्ये असणे. संवाद होत नसल्याने गैरसमज वाढत जातात. या कारणातून पती पत्नीत वाद होण्यास सुरुवात होते. या वादातूनच मुलांच्या संगोपणावरही परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोबाईल हे यामागील मुख्य कारण ठरतय. व्हॉटस ऍपसह ईतर सोशल मिडीयामुळे नवरा बायकोतील वाढत जाणारी भांडणं यासोबतच कोरोनाकाळातील आर्थिक, कौटुंबिक वाद हे यामागील कारणं आहेत.

नाशिकच्या दाव्यांची स्थिती 
त्यानुसार या न्यायालयात 2018 ते ऑक्टोबर 2022 या पाच वर्षांमध्ये तब्बल 6 हजार 638 इतके घटस्फोटाचे दावे दाखल झाले. त्यापैकी 5 हजार 460 दावे न्यायालयात निकाली निघाली. या निकाली निघालेल्या दाव्यांतील 10 हजार 14 दाव्यांतील जोडप्यांचे घटस्फोट झाले. निकाली निघालेल्या दाव्यात अवघ्या एक हजार 974 जोडप्यांची पुन्हा संसार फुलविण्याचे ठरविले. यानुसार 2018 मध्ये 1282 दाखल दावे, 1050 निकाली दावे, 1540 घटस्फोट, तर 308 तडजोड करण्यात आली. त्याचप्रमाणे 2019 मध्ये 1331 दाखल दावे, 132 निकाली दावे, 1715 घटस्फोट, तर 324 तडजोड, 2020 मध्ये 1144 दाखल दावे, 656  निकाली दावे, 2080 घटस्फोट, तर 447 तडजोड, 2021 मध्ये 1495 दाखल दावे, 1223 निकाली दावे, 2327 घटस्फोट, तर 472 तडजोड, तर 2022 मधील अतिशय चिंताजनक आहे. 2022 मध्ये 1386 दाखल दावे, 1399 निकाली दावे, 2352 घटस्फोट, तर 243 तडजोड. या आकडेवारीनुसार मागील दोन वर्षात  घटस्फोटाच्या निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या जास्त बघायला मिळते. तर 2022 मधील अतिशय चिंताजनक आहे. 2022 मध्ये 1386 दाखल दावे, 1399 निकाली दावे, 2352 घटस्फोट, तर 243 तडजोड. या आकडेवारीनुसार मागील दोन वर्षात घटस्फोटाच्या निकाली निघालेल्या दाव्यांची संख्या जास्त बघायला मिळते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget