Nashik News : दाराला तोरणं, हळदही उतरली नाही, लग्नाच्या चौथ्या दिवशी नवरीसोबत होत्याचं नव्हतं झालं...
Nashik News : अवघ्या चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नव्या नवरीचं निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik News : कोणत्याही लग्नघरी नेहमीच आनंदाचा माहोल असतो. पाहुण्यांची लगबग असते, चिल्यापिल्यांची धावपळ असते. हळद आणि लग्न असा दोन दिवस आनंदाचे वातावरण असत. मात्र अशातच एखादा अनुचित प्रकार घडला. लग्नघरी विरजण पडते आणि संपूर्ण कुटुंब दुःखात जाते. असाच काहीसा प्रकार नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola Taluka) तालुक्यात समोर आला आहे.
मागील वर्षभरात हृदय विकाराच्या (Heart Attack) झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत आहे. आज सकाळी बोललेला माणूस दुपारी बोलेल असाही भाग राहिलेला नाही. कारण क्षुल्लक आजार होऊन माणसं दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात असाच काहीसा प्रसंग घडला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका नव्या नवरीचं सर्दी, खोकला (Viral Infection) येऊन काही तासांत निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून नव्या नवरीच्या अशा जाण्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
येवला तालुक्यातील हडप सावरगाव (Sawargaon) येथील सुखेदव कोल्हे यांचा मुलासोबत पूनम हिचा 17 मार्च रोजी विवाह झाला होता. जसं प्रत्येकाच्या घरी आनंदी वातावरण असतं, त्याचप्रमाणे लग्नघरी वातावरण होत. रितीरिवाजाप्रमाणे नवरी मुलगी सासरी गेली. पहिल्या मुलाला नवरी मुलगी घरी आली. त्यानंतर लागलीच पुन्हा सासरी गेली. पुन्हा दोन दिवसांनी दुसऱ्या मुळाला परत आली. यावेळी तील सर्दी, थंडी, ताप अशी लक्षणे जाणवली. म्हणून घरच्यांनी खासगी क्लिनिकमध्ये दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर तिला येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचे निधन झाले.
संपूर्ण गाव शोकसागरात
दरम्यान पूनम ही गावात सर्वांचीच लाडकी असल्याने लग्नासाठी अख्खा गाव जमलला होता. त्या दिवशी संपूर्ण लग्नात सहभागी होत. लग्न पार पडलं. मात्र त्यानंतर लग्नाच्या चौथ्याच दिवशी आकस्मित मृत्यू (Death) झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेने येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील कोल्हे आणि कोळम येथील चव्हाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूनमवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून कुटुंबाचा दुःखाचा डोंगर कोसळला असून ही घटना गावातील सर्वांचा हृदय पिळवटून टाकणारा होता. नवरी मुलीच्या अंगावरील हळद फिटली नव्हती त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.