Sanjay Raut : पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं प्रेम 'मन की बात' वर, संविधानावर त्यांचं प्रेम नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : आम्ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी आजच्या मुंबईतील सभेच आयोजन केलं असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : आज महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) महाविकास आघाडीनं मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन केलं आहे. आजचा सभेचा दिवस हा आम्ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी निवडला असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. देशात संविधानाचे खच्चीकरण चालले आहे, त्यामुळं आम्ही संविधान वाचवा ही चळवळ सुरु केल्याचे राऊत म्हणाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संविधानावर प्रेम नाही, तर त्यांचे प्रेम मन की बात वर असल्याचे राऊत म्हणाले.
जितकं प्रेम मन की बात वर आहे तितकं प्रेम जर संविधानावर असतं तर...
संविधानाची जास्त पायमल्ली महाराष्ट्रात केली जात आहे. कायद्याचे राज्य मोडून काढलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. ते आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र अस्थिर होत आहे, याला दिल्लीचे लोक जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे संविधानावर प्रेम नाही, त्यांचे प्रेम मन की बात वर
असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच जितकं प्रेम मन की बात वर आहे तितकं प्रेम जर संविधानावर असतं तर या देशात आजच्यासारखी आवस्था निर्माण झाली नसती. शिव्यांची यादी वाचून दाखवायची वेळ पंतप्रधानांवर आली नसतीअसे राऊत म्हणाले. रडणारा पंतप्रधान देशाने प्रथमच पाहिला आहे. लोक शिव्या देतात म्हणून ते रडले. आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांवर टीका झाली आहे. पण कोणताही पंतप्रधान कधी रडला नाही. देशानं प्रथमच पंतप्रधान रडणारा पंतप्रधान पाहिल्याचे राऊत म्हणाले.
भाजपचे राज्य नाही तिथं कायद्याचे राज्य मोडून काढण्याचा प्रयत्न
जिथं भाजपचे राज्य नाही तिथं कायद्याचे राज्य मोडून काढलं जात आहे. घटनेनं ज्या संस्था निर्माण केल्या त्यावर फक्त एका राजकीय पक्षाचा हक्क असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर करण्याला दिल्लीचे आणि महाराष्ट्रातील काही लोक जबाबदार असल्याचे राऊत म्हणाले. मत मागण्यासाठी आजपर्यंत कोणतेही पंतप्रधान जाहीर सभेत कधी रडले नाहीत. पण आताचे पंतप्रधान रडल्याचे राऊत म्हणाले.
राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे
राज्यातील सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. सरकारला मन आणि हृदय असते तर श्री सेवकाच्या मृत्यूचे प्रकरण दडपलं नसते. ज्या प्रकारची चौकशी व्हायला हवी होती ती झाली नाही. सरकारला सत्तेची आणि पैशाची मस्ती असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: