(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra LIVE Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Lonavala Rasta Roko: लोणावळ्यात स्थानिकांकडून रेल रोको आंदोलन
LonaVala Rasta Roko: पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी स्थानिकांकडून लोणावळा येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखली. यावेळी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरी देखील स्थानिकांनी रेल्वे रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
PM Modi Godavari Pujan: : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदावरी नदीचे पूजन होणार
PM Modi Godavari Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदावरी नदीचे पूजन होणार आहे. नाशिक कुंभनगरी असल्यानं मोदींना चांदीचा कुंभ देऊन आणि पगडी परिधान करून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मोदीच्या दौऱ्यामुळे रामकुंड परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. निमंत्रित पुरोहित, साधू महंत आणि सुरक्षा यंत्रणाचे अधिकारी राहणार आहेत. मोदी दौऱ्यामुळे रामकुंड परिसरात होणारे धार्मीक विधी इतरत्र हलविण्यात आले आहेत. सकाळपासूनच बालाजी कोठ, रामसेतू पूजा जवळ धार्मीक विधी पार पाडले जात आहेत
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर
PM Modi Maharashta Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आहेत. मोदींच्या स्वागतासाठी नाशिक मोदीमय झालंय. सकाळी सव्वादहा वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचा रोड शो होईल, त्यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
Rajmata Jijau Jayanti 2024 : जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शरद पवार पुण्यात, लाल महालातील जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन
Rajmata Jijau Jayanti 2024 : जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांनी पुण्यातील लाल महालातील जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं.
Thane News: ठाण्यात आज दिवसभर अवजड वाहनांना बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय
Thane News: अवजड वाहनांमुळे नवी मुंबईत कोंडी होऊ नये म्हणून आज, शुक्रवारी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत. अवजड वाहनांमुळे नवी मुंबईत कोंडी होऊ नये म्हणून आज, शुक्रवारी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे.