Mumbai Live Updates: ठाकरे गटाला गळती सुरूच, माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश 

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2023 10:15 PM
Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या राज्यात लवकरच पुन्हा सभा होणार, 'इंडिया'च्या बैठकीनंतर राज्यभरात ठिकठिकाणी सभांच आयोजन

Maharashtra Politics:  महाविकास आघाडीच्या राज्यात लवकरच पुन्हा सभा होणार


इंडियाच्या बैठकीनंतर राज्यभरात ठिकठिकाणी सभांच आयोजन करण्यात येणार


या सभांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काही ठिकाणी राहुल गांधी देखील हजेरी लावणार


'इंडिया'ची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर सभांचे आयोजन करण्यात येणार


शरद पवारांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

Eknath Shinde : ठाकरे गटाला गळती सुरूच, माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा शिंदे गटात प्रवेश 

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

Ahmednagar Crime News : राहुरीत अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात दोन गटात वाद, परस्पर विरोधी फिर्याद दाखल; गावात शांतता
Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीसोबत सेल्फी काढून व्हायरल करण्याची धमकी देणारा मुलगा आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून दोन गटात वाद झाला असून सध्या गावात शांतता आहे. Read More
Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना 5 वर्षांनंतर जामीन मंजूर, वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा
Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पाच वर्षापासून तुरुंगात असलेले आरोपी वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. Read More
NCRB Report : 2021 मध्ये भारतात सुमारे 4 लाख महिला, 90,113 मुली बेपत्ता, यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
Missing Women in Maharashtra : भारतात 2021 मध्ये 3,75,058 महिला आणि 90,113 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती NCRB अहवालात उघड झाली आहे. या यादीत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. Read More
Jalgaon Crime : जळगावमध्ये अज्ञाताकडून घरावर गोळीबार, घरात कुणी नसल्याने अनर्थ टळला, आठ दिवसांतील दुसरी घटना
Jalgaon Crime : जळगावमध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. Read More
Nashik News : गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार, नाशिकवर अवकृपाच
Nashik News : नाशिकमध्ये अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा असली तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. Read More
Beed News : अर्धा पावसाळा संपला तरी बीड जिल्ह्यातील 36 प्रकल्प कोरडेठाकच, माजलगाव धरणात फक्त 16 टक्केच पाणीसाठा शिल्लक
Beed News : राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. पण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र सध्या आहे. Read More
Assembly Monsoon Session : 'माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार नाही', मुख्यमंत्री शिंदे यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी
Assembly Monsoon Session : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सरकारच्या निर्णयाविषयी माहिती दिली. Read More
Pune-Mumbai Express Way : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. Read More
Pune Metro : पुणे मेट्रोत विद्यार्थ्यांना सवलत; पाहा किती आहे तिकिट दर?
महा मेट्रोने पुण्यातील विस्तारित मार्गांवर मेट्रोने शहरातील विद्यार्थी आणि नागरिकांना पुणे मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सवलती जाहीर केल्या आहेत. Read More
चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडला, पालकांची पाचावर धारण बसली, दैव बलवत्तर म्हणून...
'देव तारी, त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय नाशिककरांना आला. चौथ्या मजल्यावरून पडूनही तीन वर्षांचा चिमुकला सुखरूप असल्याची सुखद घटना नाशिकरोड पूर्व भागातील चेहडी पंपिंग भागात घडली.  Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.