Pune Metro : पुणे मेट्रोत विद्यार्थ्यांना सवलत; पाहा किती आहे तिकिट दर?
महा मेट्रोने पुण्यातील विस्तारित मार्गांवर मेट्रोने शहरातील विद्यार्थी आणि नागरिकांना पुणे मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सवलती जाहीर केल्या आहेत.
Pune Metro : महा मेट्रोने पुण्यातील विस्तारित (Pune metro) मार्गांवर मेट्रोने शहरातील विद्यार्थी आणि नागरिकांना पुणे मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सवलती जाहीर केल्या आहेत. सिव्हील कोर्ट ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांचे अधिकृत लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. या मार्गावर विद्यार्थ्यांनी प्रवास करावा, यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.
मेट्रो अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना सर्व दिवसांसाठी तिकिट भाड्यात 30 टक्के सवलत दिली जाईल तर इतर प्रवासी देखील शनिवार आणि रविवारच्या सवलतीसाठी पात्र असतील. ते शनिवार आणि रविवारी 30 टक्के कमी तिकीट भाडे देतील. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या प्रवासाचे तिकीट भाडे 25 रुपये असेल तर सिव्हील कोर्ट ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन दरम्यानचे तिकीट भाडे 20 रुपये असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो दररोज सकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान चालेल आणि गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी आणि सामान्य वेळेत 15 मिनिटांनी ट्रेन प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. या मार्गांवर एकूण 11 गाड्या धावतील, असे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.
वनाझ ते गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन दरम्यानच्या पुणे मेट्रोच्या दोन लेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी 6 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले होते. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारण्यासाठी ते 1 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते मेट्रोच्या दोन विस्तारित मार्गांचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
सर्वात खोल मेट्रो स्टेशनचे वैशिष्ट्य
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर कार, बाईक आणि सायकलसाठी पार्किंगची जागा बनवली जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) बस टर्मिनस व्यतिरिक्त, अॅग्रीगेटर आणि ऑटोरिक्षांसाठी पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉइंट्स देखील तयार करण्यात आले आहेत. पाच ये-जा करण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले आहेत. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन कॉम्प्लेक्सला जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधला आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनला हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या लाईनशी जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज बांधण्याची योजना असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Indigo: इंडिगोच्या विमानात महिलेचा विनयभंग; प्राध्यापक असलेल्या आरोपीला अटक