Kolhapur News: शिवसैनिकालाच उमेदवारी द्या, उसना कुणीही नको; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापुरातून एकमुखाने मागणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Amravati news: आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीसा बजावल्या आहेत.उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी काही गैरप्रकार केल्यास कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीसांनी या नोटीसमध्ये म्हटलं आहे.
Maharashtra Politics: आज शिंदेच्या शिवसेनेचा अल्पसंख्यांक मुस्लिम मेळावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नेते बांधणार या मेळाव्यातून अल्पसंख्याक समाजाची मोट
मुस्लिम समाजाचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न, समस्या आणि विविध मागण्या पुढील काळात कशाप्रकारे सोडवल्या जातील आणि अल्पसंख्याक समाजासाठी नवीन काही घोषणा या मेळाव्यात करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करण्याची शक्यता आहे.
Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ होत आहे, तेही रामभरोसे. चिपी विमानतळावर अलायन्स एअरची विमानसेवा सुरू असून सद्यस्थितीत सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे चारच दिवस विमान ये-जा करते, उर्वरीत बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस विमान येत नाही. पावसामुळे वातावरण खराब झाल्यास त्या दिवशी विमानसेवा रद्द केली जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरील विमानसेवा रामभरोसे सुरू आहे. याचा फटका विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. याकडे राजकिय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
Bhandara Rain Updates: गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं आज सकाळपासून गोसीखुर्द धरणाची पाच गेट अर्धा मीटरनं उघडण्यात आली आहे. या पाच गेट मधून 19551 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसीखुर्द धरणाच्या ऊर्ध्व भागातील धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात येणार आहे. कालपासून गोसीखुर्द धरणाचे तीन वक्रद्वार अर्धा मिटरनं उघडून त्यातून 11656 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आज यात आणखी दोन गेट उघडून पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात आली आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -