Maharashtra Rain Update : आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट 

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jul 2023 08:19 AM
मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस, वाहतुकीवर परिणाम

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे

मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं तर पश्चिम रेल्वेची दोन ते पाच मिनिटं उशिराने

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक दोन ते पाच मिनिटं उशिराने सुरु आहे. दक्षिण मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दोन्ही बाजूकडील म्हणजे पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत आहे


 

मुखेड तालुक्यात जोरदार पाऊस

Nanded Rain : मुखेड तालुक्यातील पाळा येथे रात्री अंदाजे 8 च्या सुमारास (दि. 5 ) मुसळधार पाऊस पडल्याने गावालगत असलेल्या नाल्याला पुर आला. शेतात कामाला गेलेल्या नागरीकांना पुर आल्याने गावात येता येत नव्हते. यामुळे जेसीबीच्या सहाय्याने रात्री नाल्यापलीकडील 30 ते 35 नागरीकांना सुखरुप गावाकडे आणण्यात आले. या घटनेकडे तहसिलदार राजेश जाधव हे विशेष लक्ष देऊन नागरीकांच्या संपर्कात होते. तर गावातही काही दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

Mumabi Rain : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर धुक्याची चादर

Mumabi Rain : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल धुक्यात हरवलाय. आज पहाटेपासूनच द्रुतगतीवर धुक्याची दुलई पसरलीये त्यामुळे वाहन चालकांना लाईट लावूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत वाहन चालक मार्गस्थ होत असल्याचं चित्र सध्या एक्स्प्रेस वेवर दिसून येत आहे..

Maharashtra Rain : उद्या कोकणाला रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा

उद्या कोकणाला रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा.


मुंबई, ठाण्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा.


रायगड आणि रत्नागिरीत उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी.


नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज. 


विदर्भातही उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. 


मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट.


उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबारमध्ये विजांसह पावसाचा अंदाज.

Eknath Shinde: मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत; शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत,  पण त्यात काही तथ्य नसून मुख्यमंत्री राजीनामा देणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार सत्तेत आल्याने कोणतीही नाराजी नसून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान 
Shirdi Sai Baba : शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गुरूपोर्णिमा उत्सवात तब्बल सात कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. Read More
Chhagan Bhujbal NCP : पवार साहेब, आमच्यासाठी विठ्ठल! फक्त बडव्यांना बाजूला करा अन् आम्हाला पोटाशी धरा : छगन भुजबळ 
Chhagan Bhujbal NCP : शरद पवार साहेब तुमच्याभोवतीच्या बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशीर्वाद द्या, असे आवाहन भुजबळांनी केले. Read More
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा, पण पावसाचा पत्ताच नाही; खरीप संकटात येण्याची चिन्हं
मंगळवारी कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या 24 तासांत अवघ्या 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. Read More
Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?
NCP Political Crisis : छगन भुजबळ यांनी बोलताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं वक्तव्य केलं आहे. पण त्यांचा नेमका रोख कोणाकडे? याच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More
चल आपण पळून जाऊ... लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Nashik Congress : "जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष, काँग्रेस म्हणू अन् काँग्रेस आणू"; नाशिकमधील फलक चर्चेत 
Nashik Congress : नाशिक शहरात काँग्रेस पक्षाकडून 'काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू,' अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. Read More
Sangli Crime: अल्पवयीन मुलीचे नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, सांगून ऐकत नसल्याने वडिलांनीच केला खून; सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचं पहिलं टार्गेट छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या येवला मतदारसंघात...
Nashik Sharad Pawar : शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला येथे होणार आहे. Read More
Chhatrapati Sambhaji Nagar Rain : संभाजीनगरच्या संजरपूरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले
Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी आणि करंजगाव शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस मंगळवारी सायंकाळी पडला. Read More
Nashik Saroj Ahire : शरद पवार हे वडिलांसमान, मात्र अजित पवारांच्या शपथविधीलाही उपस्थित; नाशिकच्या सरोज अहिरे कुणासोबत?
Nashik Saroj Ahire : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आमदार सरोज अहिरे नेमक्या कुणाच्या बाजूने हा प्रश्न अनुत्तरित आहे.  Read More
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू; आक्षेपार्ह घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3)  अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे आणि सभा घेणे, याला बंदी असेल.  Read More
Temple Dress Code : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्येही आता 'ड्रेसकोड'; वेगवेगळ्या 20 मंदिरात लागले फलक
Temple Dress Code : शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे. Read More
Hasan Mushrif vs Samarjeetsinh Ghatge: कट्टर विरोधक हसन मुश्रीफ मंत्री होताच नाराज समरजित घाटगेंना नेमका फडणवीसांना कोणता शब्द दिला? 
मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच राजे भूमिगत झाले होते. संपर्कात असणारे रविवार दुपारपासून त्यांचा संपर्क होत नव्हता. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. Read More
राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस; शरद पवार, अजित पवारांनी बोलावल्या स्वतंत्र बैठका, आमदारांना व्हीप जारी
Maharashtra NCP Crisis : आजचा दिवस महाराष्ट्रातील राजयकीय उलथापालथी दरम्यान अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं आज शक्तिप्रदर्शन असणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पावसानं हजेरी लावलेली नाही. काही भागातच पाऊस झाला आहे. त्यामुळं  अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कामं खोळंबली आहेत. सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यासह मराठवाड्यातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान आजही कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट


राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.


आज मंत्रिमंडळाची बैठक


राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.


काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 


राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.


मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.