Pankaja Munde Dasara Melava : शिवशक्ती परिक्रमानंतर आता पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? 'या' मुद्यांवर भाष्य करण्याची शक्यता

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Oct 2023 10:51 PM
Dasara Melava : शिंदे गटाच्या मेळाव्याला सदावर्तेंकडून एसटी कर्मचाऱ्यांची रसद? व्हायरल मेसेजवरून चर्चांना उधाण
Shiv Sena Dasara Melava : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कायम वादात असणारे एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांची रसद पुरवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Pankaja Munde Dasara Melava : शिवशक्ती परिक्रमानंतर आता पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? 'या' मुद्यांवर भाष्य करण्याची शक्यता
Pankaja Munde Dasara Melava : भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. Read More
BMC : मुंबई महापालिकेत 150 वर्ष जुने सील यंत्र आजही कार्यरत; अनेक ऐतिहासिक कागदपत्रांवर केलंय शिक्कामोर्तब
BMC Dasara : मुंबई महापालिकेत तब्बल दीडशे वर्ष वय असलेल्या ऐतिहासिक यंत्राने उमटविण्यात येणारा शिक्का आजही तेवढाच ठसठशीत आहे. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने निमित्ताने या यंत्राचे पूजन करून या यंत्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते Read More
Maratha Reservation : सध्या 62 टक्के आरक्षण , मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू; अजित पवारांकडून जातनिहाय जनगणनेचा आग्रह
Ajit Pawar On Maratha Reservation : राज्यात सध्या EWS सह 62 टक्के आरक्षण असून उर्वरित 38 टक्क्यांमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी अभ्यास सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले. Read More
Chandrapur Adivasi Andolan : आदिवासींच्या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मध्यस्थी

चंद्रपूर : पोंभुर्णा येथे सुरू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मध्यस्थी. आदिवासींच्या ठिय्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने पोंभुरणा येथील रेस्ट हाऊसमध्ये आंदोलक आणि प्रशासनात बैठकीला सुरुवात, पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे हे आदिवासींची अवमानना करणारे आहेत, असा आक्षेप घेत गेल्या 7 दिवसांपासून आदिवासी बांधवांचे सुरू आहे. ठिय्या आंदोलन, दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी, यासोबतच पेसा अंतर्गत आदिवासी बहुल गावं सामील करावी, वनजमिनीचे पट्टे द्यावे अशा 12 मागण्यांसाठी सुरू आहे. आदिवासींचं आंदोलन, मुख्य म्हणजे पोंभुरणा तालुका हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघाचा भाग आहे.

iPhone And Drugs Seized : गोव्यातील मोपा विमानतळावर 28 आयफोन, 3.92 कोटींचे सोने जप्त

गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तिघा प्रवाशांकडून 3 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबुधाबीहून गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका विमानातील तीन प्रवाशांची  तपासणी केली. या तपासणी दरम्यान डीआरआय अधिकाऱ्यांना चेक-इन केलेल्या बॅगमध्ये एका पॅकेटमध्ये आयफोन गुंडाळलेले सापडले. तर सोन्याची पेस्ट एका प्रवाशाच्या कमरेकडे लपवून ठेवली होती. या तीनही प्रवाशांना बेकायदेशीररित्या 7 किलो सोन्याची पेस्ट आणि आयफोनची तस्करीकेल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा भाग असल्याचा डीआरआय ला संशय असल्याने त्यांची करून चौकशी केली जात आहे.

Shirdi Saibaba : साईंच्या पुण्यतिथीसाठी अवघी साईनगरी सजली, चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सव, भाविकांची मांदियाळी!
Ahmednagar News : दरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. Read More
Sharad Pawar: शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द, कारण अद्याप अस्पष्ट
शरद पवारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत.  मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केलाय.   Read More
Dharmaveer 2 : साक्षात आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात तेव्हा; धर्मवीरांच्या रुपात प्रसाद ओकने केली अष्टमीची आरती
Dharmaveer 2 : ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन घेत अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak)'धर्मवीर 2' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.