Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोका लागलेला खंडणीखोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या संपत्तीचा थांगपत्ता अजूनही लागला नसून बीड, पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शीपर्यंत त्याची संपत्ती असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये वाल्मीक कराडची 100 कोटींवर संपत्ती असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये तब्बल 35 एकर जमीन वाल्मीक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. 






बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातबारा


मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातबारा आहे. या संदर्भातील ट्विट सुद्धा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलं आहे. या संदर्भाने एबीपी माझाने माहिती घेतली असताना ज्योतीच्या नावावर शेंद्री गावामध्ये एकूण चार शेत जमीन असून त्या सर्व ज्योती जाधवच्या नावाने खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदी केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ जवळपास 35 एकरांच्या घरात असून अंदाजे मुल्य दीड कोटी रुपयांचा आसपास आहे. ही जमीन एप्रिल एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा वाल्मीक कराडची मोठी संपत्ती असल्याचे समोर आले होते.दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावे होते. त्यामुळे पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता कोट्यवधींची जमीन आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या