Devendra Fadnavis : शिवसेना, राष्ट्रवादीसोबत असले तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस : देवेंद्र फडणवीस
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Pune ST Bus Accident : पुणे: दोन एसटी चालकांच्या शर्यतीत निरपराध नागरिकाने प्राण गमावले? पोलीस म्हणतात...
Devendra Fadnavis : शिवसेना, राष्ट्रवादीसोबत असले तरी राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस : देवेंद्र फडणवीस
Kalyan : तुम मराठी लोग ऐसेही...मराठी युवकाचा अपमान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांची मारहाण
कमी पटसंख्या असलेला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नयेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन
Beed News : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर याच निर्णयाला विरोध करण्यासाठी बीडमध्ये इन्फंट इंडिया या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं बीड जिल्ह्यामध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 650 शाळा बंद होणार असून यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक नुकसान होईल त्यामुळे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुराची मुलं ही वाडी वस्ती तांड्यावर याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात त्यामुळे त्यांच्या देखील शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आहे.
Maharashtra News: स्मशानभूमी नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार
Maharashtra News: गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्यावरच भर पावसात अंत्यविधी करण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बाभुळगाव खालसा येथे घडलीये. बाभुळगाव खालसा येथील कांताबाई साबळे यांचा रविवारी मृत्यू झाला, मात्र गावात स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात कांताबाई यांच्यावर रस्त्याच्याकडेला अंत्यसंस्कार करावे लागले. अनेक वेळेस मागणी करूनही गावाला स्मशानभूमी मिळत नाही, स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतकडे नियोजित जागा नाही, गावातील कोणी जागा द्यायलाही तयार नसल्यामुळे गावातील मयत ग्रामस्थांची मृत्यूनंतरही उपेक्षा होत आहे या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.