CM Eknath Shinde: ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी मोहीम सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jun 2023 11:15 PM
Latur: रामदास आठवलेंनी घेतली अत्याचारग्रस्त कुटुंबीयांची भेट; हत्या झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी
Maharashtra News: लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये केवळ तीन हजार रुपयांसाठी एका इसमाची हत्या करण्यात आली. पीडित कुटुंबाची रामदास आठवलेंनी भेट घेतली आहे. Read More
Vishalgad Fort: विशाळगड परिसरातील पशुबळीच्या मुद्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका; हायकोर्टाने सुनावले
High Court Hear PIL on Vishalgad: विशाळगड येथील पशूबळी प्रथेला घालण्यात आलेल्या बंदीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे खडेबोल हायकोर्टाने दोन्ही बाजूंना सुनावले. Read More
CM Eknath Shinde: ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी मोहीम सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
CM Eknath Shinde: बैठकीत ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर पुरवठादार मुकादमाकडून होणाऱ्या फसवणूकीच्या प्रकरणांवर चर्चा झाली. Read More
Mayur Shinde : कधी शिवसेना, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी, संजय राऊतांना धमकी देणारा मयुर शिंदे कोण ?
Mayur Shinde : मयूर शिंदे याचा या संपूर्ण प्रकरणात नेमका काय रोल होता याचा तपास आता या पुढील काळात कांजूर पोलीस करणार आहेत. Read More
School: सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग; शिक्षण मंत्र्यांची माहिती
School Education: राज्यात आता लहान मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी मराठीसह सगळ्याच माध्यमांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. Read More
Sangli Crime: मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
एसटी स्टँड परिसरात रिक्षामधून गांजा विक्री करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार मिरज एसटी स्टँड परिसरात पोलिस पथक तयार करून सापळा रचण्यात आला. Read More
Beed District News: धक्कादायक! ऊस तोडणीच्या पैशासाठी मजुरांच्या मुलांना डांबून ठेवले, जिल्हा व बालकल्याण समितीकडून सुटका
Beed  Crime News: बीडमध्ये आणल्यानंतर या सहा मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांच्या मदतीने कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.  Read More
Nagpur Crime : महिला डॉक्टर म्हणून रुग्णालयात वावरणाऱ्या बुरखाधारी पुरूषाला अटक; नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील घटना
Nagpur Crime : गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एक बुरखाधारी महिला डॉक्टर वावरताना दिसत होती. पण ती महिला डॉक्टर नसून पुरूष असल्याचं उघड झालं आहे. Read More
Maharashtra Election Survey: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कुणाला? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष
Maharashtra Election Survey Results: आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे? याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. Read More
Ashadhi Wari : अहमदनगरमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा, तर मुक्ताबाईंची पालखी बीड शहराकडे मार्गस्थ
Ashadhi Wari 2023 : संत निवृत्तीनाथांची पालखी आज दिवसभर समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अहमदनगर शहरात असणार आहे.  Read More
Morning Headlines 15th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Ashadhi Wari 2023 : आषाढी यात्रेसाठी 100 टन कुंकू बुक्क्याची निर्मिती पूर्ण, पंढरपुरात बाजारपेठ सजल्या, 800 किलो कुंकवाच्या पराती लागल्या
Ashadhi Yatra 2023 : आषाढी यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 10 ते 15 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा सुगीचा काळ असतो. यामुळेच हे कारखानदार जवळपास दीड ते दोन महिन्यापासून तयारीला लागलेले असतात. Read More
30 मिनिटांच्या आगीमुळे 90 मिनिटं कोलकाता विमानतळाची वाहतूक ठप्प; सुदैवानं जीवितहानी टळली
Kolkata Airport Fire Update: कोलकाता विमानतळावर आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Read More
तामिळनाडूमध्ये परवानगीशिवाय CBI तपास करू शकणार नाही; स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय
ED Arrested DMK Minister: केंद्रीय तपास यंत्रणेला राज्यातील कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी तामिळनाडू सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. 
Ads by



WTC चा अंतिम सामना 
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 



पालखी सोहळा 
-  त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे.


- शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे.  



राष्ट्रीय 
हरियाणा - फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार



दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होणार



मुंबई 
- शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे 


-   मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवैस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


-  राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


पुणे  
- जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. 
- जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. 


नवी मुंबई 
- तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन समारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत
 


अहमदनगर 
- कथित लव जिहाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा प्रकरण घडल्याच किरीट सोमय्यांचा दावा आहे. 


- भाजप खासदार सुजय विखे पाटलांची पत्रकार परिषद


- शिर्डीमध्ये काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉल पाणी जलपूजन असून संध्याकाळी 4 वाजता सभा होणार 


 सांगली 
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जत तालुक्यात 55 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.