एक्स्प्लोर

Mayur Shinde : कधी शिवसेना, कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी, संजय राऊतांना धमकी देणारा मयुर शिंदे कोण ?

Mayur Shinde : मयूर शिंदे याचा या संपूर्ण प्रकरणात नेमका काय रोल होता याचा तपास आता या पुढील काळात कांजूर पोलीस करणार आहेत.

Mayur Shinde :  संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. गोवंडी परिसरातून दहा तारखेला रिजवान जुल्फिकार अन्सारी आणि शाहिद अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याच परिसरातून आकाश पटेल याला अटक करण्यात आलेली आहे, या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून 13 तारखेला मुन्ना शेख याला ठाण्यातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 तारखेला मयूर शिंदे हा पाचवा आरोपी गजाआड झाला.  आज मुन्ना शेख आणि मयूर शिंदे या दोघांना मुलुंड न्यायालयात हजर केले. या आरोपींना 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मयूर शिंदे याचा या संपूर्ण प्रकरणात नेमका काय रोल होता याचा तपास आता या पुढील काळात कांजूर पोलीस करणार आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांना धमकीप्रकरणात अटक असलेल्या मयुर शिंदे हा व्यक्ती चर्चेत आहे. 

मयुर शिंदे याला अटक होताच त्याचं कनेक्शन राऊतांशीच जोडलं गेलं कारण मयुर शिंदे हा सुनिल राऊतांचा जवळचा मानला जायचा. मयुर शिंदे भाजपमध्ये होता.. कधी शिवसेनेत होता... अहो तो कधी राष्ट्रवादीत होता... छे छे तो तर शिंदे आणि भाजपमध्ये आहे... सध्या असा सगळा घोळ सुरु आहे. त्यामुळे हा बनाव नेमका कोणी रचला ? का रचला ? याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित होतात. 

जसे ऋतू बदलतात तसे मयुर शिंदे या महाशयांनी पक्ष बदलेले आहेत. कधी भाजप कधी शिवसेना तर कधी राष्ट्रावादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशाचे फोटो यांच्या फेसबुक पेजवर आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुनील राऊत यांच्या फोनवर फोन आला आणि सकाळचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालेन अशी धमकी दिली. या प्रकरणाची ॲाडिओ क्लिपही व्हायरल झाली. पोलीसांनी धागेदोरे शोधायचा प्रयत्न केला, शेवटी कधीकाळी सुनिल राऊतांचा राईट हॅन्ड म्हणून कामकरणा-या मयुर शिंदेच पोलीसांच्या हाती लागला. त्यानंतर सुरु झाला महाराष्ट्रांच्या राजकारणातला नवा क्लायमॅक्स ….!!!!

मयुर शिंदे आहे तरी कोण ?

मयूर शिंदे पिल्ले गॅंगचा माणूस मानला जायचा. भांडुप येथील रियल इस्टेट धंद्यातील विकासक वैभव कोकाटे याच्यावर ४/११/२०११ मध्ये फायरिंग केली होती. पोलीस अधिकारी याला शिवीगाळ केल्याने १९ मार्च, २०१६ मयूर शिंदे याला ७ साथीदारांसह  मुलुंड पोलिसांनी अटक केली. सन 2000 साली गुलाम अली इसमाच्या हत्या प्रकरणी शिंदेला अटक झाली होती. मुंबई पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत सन 2000 सालानंतर अटक केली. मुंबईतून तडीपार केल्यानंतर ठाण्यात आश्रयाला गेला. 
10 एप्रिल 2022 मध्ये मयूर शिंदे याने शिवसेना भाजपला रामराम ठोकीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक गुन्ह्यांची नोंद वाढू लागताच त्यांची सध्या राजकीय प्रवासाकडे वाटचाल सुरु होती. पक्ष कुठलाही निश्चित नाही मात्र राष्ट्रवादीच्या तिकीटावरून ठाण्यात निवडणुकाची तयारी करत होता. 

मुंबईत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. एवढं सगळे पाश्वभूमी असताना संजय राऊत, सुनिल राऊत आणि जितेद्र आव्हाड या नेत्यांसोबतचे जास्त फोटो फेसबुकवर आहेत. याच फोटोंनी राऊतांना अडचणीत आणलं. पण राऊत मात्र या सगळ्या गोष्टींचा इन्कार करतायत. मयुर शिंदे ला हाताशी धरत सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राऊत करत आहेत.  

राऊत काय म्हणाले ?

हे महाशय सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले.कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो.एकनाथ शिंदेया जवळच्या व्यक्तीस पकडुन शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा..राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काहीविषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात, असे ट्वीट संजय राऊत यांनी केलेय.  

नरेश म्हस्केंचा आव्हाडांना टोला -

नरेश म्हस्केंनी मात्र नाव न घेता जिंतेद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील एकमेव सज्जन नेत्याचाही खास माणूस आहे ,हे म्हणत आहेत हे खरे आहे का ? असे नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 

दरम्यान, आता प्रकरण एवढं गंभीर आहे की हा मयुर शिंदेचं सगळ्याबरोबरचं कनेक्शन बाहेर येतंय. त्यामुळे शिंदे सरकार असताना या शिंदेचं आता काय होणार? हे महत्वाचं आहे. राऊत यांच्या मागे आधीच अडचणींचा ससेमीरा लागला आहे. त्यात हे धमकी प्रकरण म्हणजे आणखी डोक्याला ताप झालाय. राऊतांच्या विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget