Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घ्या...
आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे लागलं आहे...
Pune Paper Leak : पुण्यात बार्टी, सारथी, महाज्योती CET पेपर फुटला
पुण्यात श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं समोर आलं. त्याच बरोबर, सी आणि डी सेटच्या प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचंही आढळलं, यामुळे विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या परीक्षेवर बहिष्कार टाकत निषेध नोंदवला.
Nagpur PhD Paper Leak : महाज्योतिचा पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला
महाज्योतिचा पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्याच्या प्रकरणावरुन परीक्षार्थींचा गोंधळ उडाला, यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. नागपूरच्या कमला नेहरू कॉलेज केंद्रावरील ही घटना असून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले.
Nashik Petrol Diesel : मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर
राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'हिट अँड रन ' कायद्याविरोधात मनमाडमधील टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. मध्यरात्री 12 वाजेपासून टँकर चालक पुन्हा संपावर गेले आहेत. टँकर चालकांनी 'स्टिअरिंग छोडो' आंदोलन सुरू केल्याने मनमाडच्या इंधन प्रकल्पातून होणारा इंधन पुरवठा ठप्प होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशचा इंधन पुरवठा ठप्प होणार आहे.
Buldana Farmers Against Politicians : शेतकऱ्यांनी केली राजकीय नेत्यांना गावबंदी
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील देऊळगाव धनगर या गावातील शेतकऱ्यांनी राजकीय पुढारी आणि राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी केली आहे. निवडणुकीसाठी प्रचार करण्यासही गावात बंदी करण्यात आली आहे, तशा प्रकारचे फलकही गावाच्या वेशीवर लावण्यात आले आहेत. सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतमालावर निर्यात बंदी लावून शेतमालाचे भाव पाडले आहेत. कापूस सोयाबीनलाही भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. विरोधी पक्षही यावर काहीही बोलण्यास तयार नाही, असा आरोप करत सर्वच राजकीय पक्षांना देऊळगाव धनगर या गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राजकीय पुढारी गावात येतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांचे पथकही गावाच्या वेशीवर गस्त घालत आहेत.
Hingoli CM Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज हिंगोली जिल्ह्यात सभा
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानांतर्गत महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा पार पडणार आहे, या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. आज राहुल नार्वेकर आमदार अपात्रतेचा निकाल देणार आहेत. आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे सभा घेत आहेत. दुपारी साधारणतः दोन ते अडीच वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी पोहोचतील.