Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सविस्त जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Akola Police Firing Accused Arrested : पोलिसांच्या गस्ती पथकावर गोळीबार करणारे दरोडेखोर अटकेत
Akola Police Firing Accused Arrested : अकोला जिल्ह्यातील 30 डिसेंबरच्या रात्री उरळ पोलिसांच्या गस्ती पथकावर दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांजरी फाट्यावर हा प्रकार घडला होताय. आज तब्बल 15 दिवसांनी याप्रकरणात पाच आरोपींना अकोला पोलिसांनी अटक केलीय. या आरोपींवर पोलिसांनी 25 हजारांचं बक्षीस ठेवलं होतं. 30 डिसेंबरला पोलीस पथक गस्त घालत असताना पहाटे तीनच्या सुमारास हा गोळीबार झाला होता. पथक गस्त घालत असतांना मांजरी फाट्यावर दोन दुचाकीवरील लोकांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्यात. पथकाने त्यांना हटकल्यावर त्यांनी गोळीबार सुरू केला. यात पोलीसांच्या वाहनावर नऊ गोळ्या झाडल्याचे निशाण होते. गोळीबारात एका पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणी आता अटक केलेल्या आरोपींमध्ये हातरून नखेगाव नेल धामणा शेगाव आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एका आरोपीचा समावेश आहे. हे सर्वजण परिसरात शिकारीसाठी फिरत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.
Wardha News : वर्ध्यातील दोन तरुण अयोध्येच्या दिशेने पायी निघाले
Wardha Youngster Ayodhya Visit News : अयोध्येला 22 तारखेला राम रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना तिथे जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी कोट्यावधी रामभक्त आसुसलेले आहेत. अयोध्येत जाऊन कधी रामाचं दर्शन घेता येईल याकरता प्रत्येकाची धडपड आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील दोन तरुण अयोध्येच्या दिशेने पायी निघाले आहे. पंकज माहोर आणि अंकित जोरिगवार अशी अयोध्येला निघालेल्या दोन राम भक्त तरुणांची नावे आहेत. खांद्यावर दोन बॅग, हातात रामाचा झेंडा आणि रामनामाचा जप करत, हे दोघे पुलगाव ते आयोध्या असा सुमारे 900 पेक्षा जास्त किलोमीटरचा अंतर पायी पार करणार आहे. त्यांच्याजवळ पैसेही नाहीत, मार्गावरील रामभक्तच निवासाची आणि खाण्याची व्यवस्था करत आहे.
























