Maharashtra News LIVE Updates : कारागृहासमोरच डीजेच्या कर्णकर्कश आवाजात बेधुंद नाच; पोलिसांचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
धाराशिव मतदारसंघातून सुरेश बिराजदारांना उमेदवारी देण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
Dharashiv Lok Sabha Constituency : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश बिराजदार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. या पत्रात धराधिव जिल्ह्याचे सर्व तालुकप्रमुख आणि विधानसभा अध्यक्षांकडून सही या पत्रात करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्ह्यातील सारे प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे की, सुरेश बिराजदार यांना उमेदवारी देण्यात यावी.
भर बैठकीतून राम सातपुतेंचा फडणवीसांना फोन, तब्बल 250 जणांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन
Lok Sabha Elections : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) सध्या सोलापूर शहरात (Solapur City) प्रचाराच्या निमित्ताने फिरत आहेत. काल संध्याकाळी सातपुते यांनी मोची समाज बांधवाची भेट घेतली. यावेळी शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या व्यथा सांगितल्या. कोरोना काळात मोची समाजातील युवा नेता करण म्हेत्रे यांचा मृत्यू झाला होता. करण म्हेत्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच या गर्दीत पोलिसांशी हुज्जत देखील घातल्याचे प्रकार घडले होते. ज्यानंतर पोलिसांनी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या तब्बल 250 लोकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 नुसर गुन्हा दखल केला होता. हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी ज्योती वाघमारे यांनी केली.























