Maharashtra News LIVE Updates : जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, त्यात मनोज जरागेंनी राजकीय पक्षांची धाकधूक वाढवली
Maharashtra LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर....

Background
Maharashtra News LIVE Updates : एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमधील जागावाटपावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाची धाकधूक वाढली आहे. मनोज जरांगे यांच्याकडून आज कोणती घोषणा होती आणि त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्वाचे आहे.
मोठी बातमी : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता?
मोठी बातमी : बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता?
Pankaja Munde : काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करू नका; पंकजा मुंडेंचा पोलिसांना पत्र
Pankaja Munde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असतानाच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. पंकजा मुंडे यांचा ताफा जात असतांना काही तरुणांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत पाज जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, याबाबत पंकजा मुंडे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना पत्र लिहून या मुलांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंती केली आहे.























