Maharashtra News LIVE Updates : शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल, तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये
नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत कारवाईची केली मागणी
नितेश राणेंविरोधात पोलीस पत्नी आक्रमक
मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची केली मागणी
कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची लेखी माफी मागावी
"माझे कोणी काहीही करू शकत नाही, पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?”.
अश्या प्रकारची वक्तव्य करून नितेश राणेंनी पोलीस कुटुंबीय आणि खाकी वर्दीचा अनादर केल्याचा तक्रारीत उल्लेख
अश्या प्रकारच्या वक्तव्यामुळे पोलिसांचे खाच्चिकरण होत असल्याचं केलं स्पष्ट
मी शिर्डीत निवडणुन येईन, भाजपने विचार करायला हवा : रामदास आठवले
रामदास आठवले
लोकसभा निवडणूक घोषणा मार्च पहिल्या आठवड्यात होईल
भाजप आणि मित्र पक्षासह 400 वर जागा येतील
370, महिला यांच्यासाठी,शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय व इतर निर्णयामुळे फायदा होईल
विरोधकांनी मोदींना शिव्या देण्याचं ठरवलं आहे
RPI ला राज्यात लोकसभा निवडणुकीत एक जागा तरी द्यावी
यापूर्वी RPI मुळे पालिका आणि विधानसभेत भाजपला फायदा झालाय
त्यामुळे RPI ला विसरून चालणार नाही
त्यामुळे फडणवीस यांच्याकडे अपेक्षा आहे, शिर्डीची जागा आम्हाला द्यावी. मी लढवण्यासाठी इच्छुक आहे
मी शिर्डीत निवडणुन येईन, त्यामुळे भाजपने विचार करायला हवा
आत्तासारखं वातावरण कधी पाहिलं नाही, कोण कोणत्या पक्षात हेच कळत नाही : राज ठाकरे
Raj Thackeray : महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरु असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळलं नाही. सध्या जे वातावरण आहे हे आधीच कधी पाहिलं नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर नांदगावात रास्ता रोको, नांदगाव - छ. संभाजीनगर मार्ग रोखला
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशान्वये आज नाशिकच्या नांदगाव येथील हुतात्मा चौकात मराठा बांधवांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले..यावेळी नांदगाव - संभाजीनगर मार्ग रोखत आंदोलकांनी ठिय्या मांडला..एक मराठा - लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे - सोयरे कायद्याला मंजुरी द्यावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.. आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती..
बीडच्या वडवणी शहरामध्ये सकल मराठा समाजच्या वतीने रास्ता रोको, सरकारविरोधात घोषणाबाजी
बीडच्या वडवणी शहरामध्ये सकल मराठा समाजच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण प्रश्नी व सगेसोयरे लागु करावे याप्रश्नी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल मराठा समाजाने प्रशासनाच्या विनंतीला मान देत रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे.