Maharashtra LIVE Updates :सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
यवतमाळमध्ये दोन जणांना अटक
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर आयबीच्या टीमने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले.
नागपूर आयबीने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला दिली माहिती त्यानुसार पाटनबोरी जवळ जम्मू काश्मीर पासिंग ट्रकने प्रवास करणारे दोन जण ताब्यात घेतले.
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्राची माहिती
नागपूरमध्ये भीषण आग, दोन जणांचा मृत्यू
नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुले होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला .. रात्री 9 वाजताच्या सुमारासची हि घटना असून आग लागली तेव्हा 7 वर्षाच्या बहिणी सोबत दोन लहान भाऊ घरी होते ...आग लागल्या नंतर बहीण घराच्या बाहेर धावत आली दोन्ही लहान मुले आतच अडकली .. घटनेत देवांश उईके वय सह वर्ष व प्रभास उईके वय दोन वर्ष या दोन भावांचा मृत्यू झाला. थंडी पासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली असता त्याने आग लागल्याची माहिती आहे. घटनेच्या वेळेस आई वडील कामानिमित्य बाहेर गेले होते.
कॅनलमध्ये पडला रानगवा
चंद्रपूर : गोसेखुर्द कॅनलमध्ये पडला रानगवा... नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील घटना, तीन तासांच्या रेस्क्यु ऑपरेशन नंतर रानगव्याला कॅनल बाहेर काढण्यात यश, कॅनल मध्ये पडलेला रानगवा अंदाजे 10 ते 12 वर्षांचा असून हजार किलोच्या रानगव्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या शिंगांमध्ये अडकविण्यात आला दोरीचा फास
विधानसभा व विधानपरिषद आमदारांसाठी 'मैं अटल हूँ'चा विशेष प्रयोग
विधानसभा व विधानपरिषद आमदारांसाठी 'मैं अटल हूँ'चा विशेष प्रयोग ठेवण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. विधीमंडळात उद्या सायंकाळी ६ वाजता विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व आमदार विधीमंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रयोग ठेवण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.
केंद्र सरकारच्या कोचिंग क्लासेस साठी नव्या मार्गदर्शक सूचना
केंद्र सरकारच्या कोचिंग क्लासेस साठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक आहे.
नियमांचे एकदा उल्लंघन झाल्यास पंचवीस हजार रुपये दंड पुन्हा उल्लंघन केल्यास एक लाख रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यानंतर कोचिंग क्लासेसची मान्यता रद्द होऊ शकते.नियमावलीतील व्याख्यानुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.