एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Maharashtra News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

11:20 AM (IST)  •  02 Feb 2024

Maharashtra Politics: ठाकरेंनी एक मतदारसंघ सोडला, पवारांनीही एक सोडला, पूर्व विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा!

Maharashtra Politics: सध्या लोकसभेची रणधुमाळी राज्यासह संपूर्ण देशाता पाहायला मिळत आहे. भाजपनं सत्ता काबीज करण्यासाठी तर विरोधकांनी भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी एकजूट केली आहे. अशातच राज्यात मात्र विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत मात्र फारसं काही आलबेल दिसत नाही. लोकसभेच्या जागावाटपावरुन धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीचा जागावाटप अद्यापही पूर्ण झालेला नाही. मात्र विदर्भातील दहा जागांवर संभाव्य जागावाटप कसा राहील? याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. 

पूर्व विदर्भातील सहा लोकसभा मतदार संघापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक हे पाच लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती आहे. यापैकी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसकडे असायचा. मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भंडारा-गोंदिया हा मतदार संघ काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर रामटेक मतदार संघ परंपरेने शिवसेनेकडे असायचा. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी एकनाथ शिंदे यांची वाट धरल्यानंतर शिवसेना उबाठा गटानं रामटेक मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास होकार दिल्याची माहिती आहे. 

09:24 AM (IST)  •  02 Feb 2024

Marathi Sahitya Sammelan: जळगावमध्ये आजपासून 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Marathi Sahitya Sammelan: जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहेत. यावेळी अनेक साहित्यिक सहभागी होणार आहेत. तर सकाळी साडे दहा वाजता साने गुरुजी साहित्य नगरी इथे साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी सुमित्रा महाजन, अजित पवार, संमेलन अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, मंत्री दीपक केसरकर इत्यादी मान्यवर उपस्थित असतील.

09:23 AM (IST)  •  02 Feb 2024

BMC Budget: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार, पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्रावर भर, दुसऱ्यांदा प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार

Mumbai Municipal Corporation Budget 2024-2025: मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीचा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प यंदा 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्या आहेत, तर दुसरीकडे  उत्पन्नाचे नवे स्रोतही आटले आहेत. पण तरीही निवडणूक वर्ष डोळ्यांसमोर ठेऊन फुगीर अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता कमी असली तरी, जुन्या योजना आणि प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीच्या कारभाराचा गाडा आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्यानं, यंदा सलग दुसर्‍या वर्षी प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

09:20 AM (IST)  •  02 Feb 2024

OBC Reservation: 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

OBC Reservation: 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथ यात्रा

नांदेडच्या माहूरगडावरून रथयात्रेची सुरुवात होणार

09:20 AM (IST)  •  02 Feb 2024

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा आज शेवटचा दिवस

मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही

आज रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी सॉफ्टवेअर बंद होणार

मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी मागासवर्ग आयोगाला पाठविणे बंधनकारक

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चाPunekar on CM Maharashtra  : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Embed widget