Maharashtra News LIVE Updates : उपोषण मंडपात उपोषणकर्त्याची आत्महत्या, वर्धा धरणग्रस्तांचे आंदोलन 252 दिवसांपासून आंदोलन सुरुच
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Bhandara Blast News : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट, एका कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू
Bhandara News : भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. सीएक्स विभागात हा स्फोट झाला. या दुर्घटनेत अविनाश भागवत मेश्राम (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामावर आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू झाली होती. सीएक्स विभागात दारुगोळ्याचा कोट तयार करण्याचे काम केले जाते, तिथं हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी मृतक अविनाश मेश्राम हे एकटेच असल्याने मोठी जीवितहानी टळली. आयुध निर्माणी प्रशासनाने या घटनेची गंभीर दाखल घेत आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधकांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती गठीत केली असून त्याचा अहवाल तात्काळ मागितला आहे. अहवालानंतरच स्फोटाचं नेमक कारण पुढे येईल. यापूर्वी 2 जानेवारीला भंडारा शहरालग असलेल्या सनफ्लॅग कंपनीतली स्फोटाची घटना घडली होती. त्यामध्ये आठ कर्मचारी भाजले होते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे.
Manmad Kabbadi Competition : मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
Manmad Kabbadi Competition : मनमाड : प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाला महत्व प्राप्त झाले असून अनेक तरुण करिअर म्हणून कबड्डी खेळाकडे पाहत आहे. तरुणांचा कबड्डीकडे ओघ वाढू लागला आहे. कबड्डीची पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. तब्बल 30 संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला चुरशीच्या लढतीमुळे कबड्डीप्रेमीच्या डोळ्याचे पारणे फिटले. अटीतटीच्या अंतिम सामान्यात नवयुवक क्रीडा मंडळाने अवघ्या 2 गुणांनी जयभवानी क्रीडा मंडळाचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. यावेळी विजयी संघाने एकच जल्लोष केला.























