Maharashtra News Updates 5th January 2023 : यवतमाळ: दोन निवासी डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून चाकू हल्ला, जखमी डॉक्टरांवर उपचार सुरु; निवासी डॉक्टर संपावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय. योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत.
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी अमरावतीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे उपोषण
अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुडमध्ये आजपासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषण सुरू झालं आहे. 2019 च्या विधानसभा प्रचार दरम्यान 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 5.30 वाजता देवेंद्र भुयार यांच वाहन अडवून सहा अज्ञातांनी वाहन अडवून तीन गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केली अशी तक्रार देवेंद्र भुयार यांचे ड्रायव्हर आकाश नागापुरे यांनी शेंदूरजना घाट पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला पण अज्ञात 6 जण आणि इंहोव्हा वाहनाचा शोध लागला नाही. अखेर 10 डिसेंबर 2020 रोजी पोलिसांनी हे प्रकरण कायमस्वरूपी तपासात ठेवून क्लोझर रिपोर्ट दिला. आता नेमकं ते वाहन जाळलं कोणी आणि गोळ्या खरच झाडल्या होत्या का हा मुद्दा घेत वरुड मधील सर्वपक्ष पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी आरोप केलाय. काहीजण या विरोधात उपोषणाला बसणार आहेत.
अनिल परबांची संपत्ती ताब्यात घेण्यात येणार
अनिल परबांच्या प्रॉपर्टीवर ईडीने कारवाई केले. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्रकिनारा येथे असलेले साई रिसॉर्ट सुद्धा आहे. त्यावर ईडीकडून नोटीस लावण्यात आलीये. आजपासून ती प्रॉपर्टी ईडी आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात करणार आहे.
मुंबईत आदित्य ठाकरे यांनी बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक
आदित्य ठाकरेंनी सिनेट निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली आहे. आदित्य ठाकरेंनी जिंकायची सिनेट निवडणुक त्यासाठी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह मोडवर आणण्याचं काम सुरू केलंय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी मुंबईच्या दौऱ्यावर
योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुबंई दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत विविध बॅंकांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जीआयएस रोड शोमध्ये सहभाही होतील. संध्याकाळी 6 वाजता बॉलिवूड अभिनेते आणि दिग्जांची भेट घेतील.
महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याच्या आरोपावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ: दोन निवासी डॉक्टरांना एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून चाकू हल्ला, जखमी डॉक्टरांवर उपचार सुरु; निवासी डॉक्टर संपावर
यवतमाळमध्ये दोन निवासी डाॅक्टरांना एका रुग्णाकडून चाकूनं गंभीर जखमी केल्यानंतर डाॅक्टर आक्रमक
हल्ला केल्यानंतर दोन्ही निवासी डाॅक्टरांवर उपचार सुरु
यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारासची घटना
यवतमाळमधील निवासी डाॅक्टर हल्ल्यामुळे संपावर
उद्यापासून पुन्हा महाराष्ट्रातील निवासी डाॅक्टर संपावर जाण्याच्या तयारीत
राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार - - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.
Nanded News: नांदेड जिल्हा परिषदेमधील धक्कादायक प्रकार,संचिका गायब केल्या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
Nanded News: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता सिद्धगोंडा बिरगे यांनी अर्धापूर येथील एका संस्थेला नियमबाह्य नैसर्गिक वर्ग वाढ करण्याची मान्यता दिलीय. एवढेच नाहीतर ती फाईलच गहाळ केल्याने शासनाची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उपविभागीय कार्यालयाला समजताच त्यांनी पुणे येथील मुख्य कार्यालयाला तशी माहिती कळविल्यानंतर त्या कार्यालयाच्या आदेशावरून अखेर वजिराबाद पोलीस ठाण्यात डॉ. सविता बिर्गे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
१४ वर्षाच्या मुलीने सोसायटीच्या टॅरेसवरुन उडी मारण्याचा प्रयत्न
विरार : मावशीने मोबाईल खेचल्याने रागाच्या भरात एका १४ वर्षाच्या मुलीने सोसायटीच्या टॅरेसवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. माञ विरार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्या मुलीचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे.
आज सायंकाळी साढे सहा च्या सुमारास विरारच्या मनवेल पाडा येथे आपली मावशी कडे राहायला आलेली १४ वर्षाची मुलगी ही मोबाईल वर बोलत होती. मावशीने मोबाईलवर जास्त बोलू नको म्हणत, खेचून घेतला. आणि रागाच्या भरात त्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा पाउल उचळलं. सोसायटीच्या पाचव्या मजल्याच्या टॅरेसवरील कठड्यावर चढून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. माञ आजूबाजूच्या नागरीकांनी बघितल्यानंतर मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलीसांनी मुलीचे आई वडिलांना बोलावून तिच काउन्सलिंग केलं आणि तिला खाली उतरवलं. मुलगी नालासोपारा पूर्वेला राहते. ती आपल्या मावशीकडे राहायला आली होती. मुलीची समजूत काढण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भोसले, पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड, पोलीस शिपाई सुधीर सापते यांनी जवळपास दिड तास प्रयत्न केले.