(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News Updates 22 November 2022 : शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार, नगर विकास विभागाचे आदेश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Gadchiroli Crime : कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्यास अटक
कार्यालयीन महिला कर्मचारीचा विनयभंग (Woman Molestation) केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या (Gadchiroli Zilla Prishad) मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याला गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अटक केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)
पीडित महिलेची गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार
ओंकार रामचंद्र अंबपकर (रा. गुलमोहर कॉलनी, गडचिरोली) असे आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडित महिला ही गडचिरोली जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. लेखा व वित्त अधिकारी अंबपकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने पीडित महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलवून विनयभंग करायचे. 16 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये चार वेळा बोलून सतत विनयभंग केला, अशी तक्रार पीडित महिलेने गडचिरोली पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून लपून बसलेल्या अधिकारी अंबपकर याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे ठाणेदार अरविंद कतलाम यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार
पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं 71 हजार नियुक्तीपत्रे देणार आहेत. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील तळेगाव येथे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. कोकणातील या रिफायनरच्या मुद्द्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलं आहे. 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' असं या पत्रात लिहिलेलं आहे. विनायक राऊत या बैठकीला हजर राहणार नाही असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सलील देशमुखही सहआरोपी आहेत.
शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार, नगर विकास विभागाचे आदेश
नव्या निर्णयानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच महानगरपालिकेच्या निडवणुका होण्याची शक्यता आहे.
महाडमधील ढालकाठी येथे भात गिरणीला भीषण आग, इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक
महाडमधील ढालकाठी येथे भात गिरणीला भीषण आग लागली आहे. वीज पुरवठा करणाऱ्या ट्रॉन्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन ही आग लागली आहे. महाड येथील मुक्ताई राईस मिलला ही आग लागली आहे. राईस मिलमधील भात, कोंडा आणि इलेक्ट्रीक साहित्य जळूळ खाक झाले आहे.
नाशिकमधील त्रंबकेश्वर रोडवरील आधार तीर्थ आश्रमात चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू
Nashik News Update : नाशिकमधील त्रंबकेश्वर रोडवरील आधार तीर्थ आश्रमातील चार वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झालाय. साडीने गळफास घेतलेल्या अवशस्थेत या मुलाचा मृतदेह आढळला आहे. या आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलांचे संगोपन होते. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे.
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात, भरधाव वेगातील कंटेनरची दुभाजकाला धडक
Pune News Update : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील दुभाजकाला धडकला. या धडकेत दोन चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.
Bullock Cart Race: बैलगाडा शर्यतींबाबत उद्या सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी
बैलगाडा शर्यतींबाबत उद्या सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूतील प्रकरणं एकत्रित ऐकली जाणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची उत्सुकता असेल.