एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 21 October 2022 : सगळे उत्सव जोरात साजरे करण्याची कमिटमेंट दिली होती ती पाळली - शिंदे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 21 October 2022 :  सगळे उत्सव जोरात साजरे करण्याची कमिटमेंट दिली होती ती पाळली - शिंदे

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सुनावणी 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सीबीआय केसमधील जामीनावर कोर्ट आज निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. अनिल देशमुख सध्या जसलोक रूग्णालयात दाखल आहेत. 

आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकत्र

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त हे तिन्ही महत्त्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उदघाटन होणार आहे. गेल्या वर्षी या दीपोत्सवावरुन सेना आणि मनसेत वाद झाला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असून दुपारपर्यंत शहरातील विविध कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहेत. यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शिंदे गटाच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान नाशिकमध्ये पहिले वहिले शिंदे गटाचे संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उदघाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम समजला जात आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणी साठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणुका रंगणार आहे. त्यादृष्टीने देखील तयारीचा श्रीगणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिंधुदुर्गात भाजपकडून संविधान रॅली

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी चौकशीला सामोरे न जाता कार्यालयावर मोर्चा काढत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. त्यासाठी भाजपकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजप कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथ दर्शनाला  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणार आहेत. केदारनाथला मोदी सकाळी 8.30 वाजता पोहचतील आणि पूजा करतील. त्यानंतर मोदींच्या हस्ते रोपवे योजनेचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मोदी बद्रीनाथाला जाऊन पूजा करतील. बद्रीनाथलाही रोपवे आणि विविध योजनांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस

आज वसुबारस म्हणजेच दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी गायीची पूजा केली जाते आणि दिवाळीचा शुभ पर्वाची सुरुवात केली जाते. 

23:41 PM (IST)  •  21 Oct 2022

दादर, ठाणे आणि कल्याण आणि महत्वाच्या रेल्वे स्थानकावर आता प्लॅटफॅार्म तिकिट 50 रुपये

दिवाळीमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्लॅटफॅार्म तिकिटांच्या किंमतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाढ केली आहे. सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकावर प्लॅटफॅार्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्वीट करत दिली आहे. 

22:46 PM (IST)  •  21 Oct 2022

वामनराव पै यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

समाज सुधारक आणि तत्वज्ञ वामनराव पै यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतील दामोदर हॉल येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज पासून वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे. त्याचेच औचित्य साधून पुढील एक वर्षात संस्कार शिक्षण अभियान, व्यसन मुक्ती अभियान, ग्राम समृध्दी अभियान, अवयव दान अभियान, कौटुंबिक सौख्य अभियान, बाल संस्कार अभियान, कॉर्पोरेट कोर्सेस राबविण्यात येणार आहेत. आज दामोदर हॉल येथे हजारोंच्या संख्येने वामनराव पै यांचे अनुयायक जमले होते. या सर्व अनुयायांना अमरावती यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै यांनी प्रबोधनात्मक भाषण केले. जीवन विद्या मिशन ट्रस्ट तर्फे पुढील एक वर्षासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

20:42 PM (IST)  •  21 Oct 2022

Coronavirus : राज्यात आज 402 नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus : राज्यात आज 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 402 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. 

19:11 PM (IST)  •  21 Oct 2022

आमच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटू - आमदार देवेंद्र भुयार 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला लागाल तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, जुना देवेंद्र भुयार जागवू नका असा धमकीवजा इशारा मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्थानिक विरोधकांना दिला. आमदार भुयार यांच्या या वक्ताव्याने ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आज वरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि विधान परिषद आमदार एकनाथ खडसे, आमदार निलेश लंके मंचावर उपस्थित होते. यावेळी स्थानिक विरोधक काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्यावर टीका करतांना आमदार देवेंद्र भुयार यांनी तलवारीने हात छाटण्याचे वक्तव्य हे केले. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र भुयार हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेला आपल्या गळ्यात घालून होते. 

19:10 PM (IST)  •  21 Oct 2022

उल्हासनगरात चोरट्याने मोबाईल दुकान फोडलं

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील स्वामी शांतीप्रकाश आश्रम रोडवर साहिल श्यामदासानी यांचं मोबाईलचं दुकान आहे. १६ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने दुकानाचं शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे महागडे मोबाईल चोरले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेतायत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Manmohan Singh News : संकट काळात मनमोहन सिंग यांनी देशाला दिशी दिली- शरद पवारABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सRahul Gandhi Tribute Manmohan Singh : माझा मार्गदर्शक हरपला..राहलु गांधी आणि कुटुंबीयांकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली अर्पणCity 60 | सिटी 60 शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 27 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Mamata Machinery IPO : ममता मशिनरीच्या आयपीओचं धमाकेदार लिस्टींग, 243 चा स्टॉक पोहोचला 630 रुपयांवर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई
ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल, आयपीओ लिस्ट होताच लागलं अप्पर सर्किट, शेअर बनला रॉकेट 
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Dharashiv Crime: धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
धाराशिवच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीला धडकी भरली, थरथरत्या स्वरात म्हणाल्या...
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Embed widget