Maharashtra News Updates 14 November 2022 : ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Jitendra Awhad : माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा अडचणीत आले असल्याचं दिसत आहे. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण (Woman Molestation Case) समोर आले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Nana Patole : जगातील आणि देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार नोटबंदीच्या काळात झाला आहे. ते पैसे भाजपच्या घरात गेले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार हल्लाबोल केला. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना बदनाम केले, पण आता लोकांना वास्तव काय ते लक्षात आलं असल्याचे पटोले म्हणाले.
भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस
रविवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. आज सकाळी 6.30 वाजता कळमनुरी, हिंगोलीतून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता हिंगोलीतील माळहीवरा येथे कॉर्नर सभा होणार आहे आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असणार आहे.
नामनिर्देशित 12 आमदारांच्या याचिकेसंबंधी आज सुनावणी
विधान परिषदेवरील 12 नामनिर्देशित आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीसंदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्धात बारगळलेल्या नियुक्त्या सरकार बदललं तरीही अद्याप प्रलंबितच आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं जुनी यादी रद्द केली असली तरी नव्या नियुक्त्या कधी हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
ऑक्टोबरमधील महागाईच्या दराचे आकडे जाहीर होणार
ऑक्टोबरमधील महागाई दराचे आकडे आज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केले जाणार आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढ झाली आहे की सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला हे यातून कळणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल असं भाकीत वर्तवलंय. त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
ठाण्यातील किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आला आहे. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आलाय. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
कोल्हापूर : वाजतगाजत कचरा आणला आणि ग्रामपंचायत कार्यालयात टाकला!
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला लागून असलेल्या कबनूरमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी वाजतगाजत कचरा आणून थेट ग्रामपंचायत कार्यालयात टाकला. कबनूरमध्ये घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून घंटागाडी, कचरा उठाव बंद आहे. त्यामुळे मिळेल त्या मोकळ्या जागेत कचरा आणून टाकण्याचा प्रकार सुरु आहे.
Solapur News : पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर
पहिल्या फेरीत धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास अडीच ते तीन हजार मतांनी सर्वच उमेदवार आघाडीवरती आहेत.
पुळूज व्यक्ती उत्पादक गट
विश्वराज महाडिक- 5826(महाडिक पॅनल)
देवानंद गुंड - 2177 (राजन पाटील पॅनल)
(आघाडी - 3649)
पुळूज व्यक्ती उत्पादक गट
बिभीषण वाघ- 5621(महाडिक पॅनल)
कल्याणराव पाटील - 2229(राजन पाटील पॅनल)
(आघाडी -3392)
टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट
संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)
शिवाजी भोसले - 2950(राजन पाटील पॅनल)
(आघाडी 2860)
टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट
सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)
राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)
(आघाडी - 3669)
सुस्ते व्यक्ती उत्पदक गट
तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)
पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3596
सुस्ते व्यक्ती उत्पदक गट
संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)
विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3404
अंकोली व्यक्ती उत्पदक गट
सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)
भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3527
गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)
रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)
आघाडी,- 3505
कोन्हेरी गट
राजेंद्र टेकळे - 5666(महाडिक पॅनल)
कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3350
अनुसूचित जाती जमाती
बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)
भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)
आघाडी : 3500
महिला राखीव
सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)
अर्चना घाडगे -2230(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3631
महिला राखीव
प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)
सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3517
इतर मागास प्रवर्ग
अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)
राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)
आघाडी : 3669
भटक्या विमुक्त जाती जमाती
सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)
राजू गावडे - 2215(राजन पाटील पॅनल)
आघाडी - 3627
इंग्लंड-पाकिस्तान मॅचवर सट्टा, बीडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
Beed News Update : इंग्लंड-पाकिस्तान मॅचवर सट्टा लावल्याप्रकणी बीडमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. इंग्लंड-पाकिस्तानमध्ये टी20 वर्ल्डकपचा फायनल सामना सुरू असताना अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टा लावण्यात येत होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून सट्टा लावणाऱ्या चौघा जणांना ताब्यात घेतले. ऑनलाईन फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता क्रिकेटवर सट्टाही ऑनलाईन लावला जातो. हे सट्टेबहाद्दर एखाद्या वाहनात उंच डोंगरावर, आड रानात कुठेही बसून सट्टा घेतात. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील दस्तगीर वाढीतील शिवारात भाकरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये इंग्लंड-पाकिस्तान या फायनल टी ट्वेन्टी वर्ल्डकपच्या मॅचवर सट्टा सुरू होता.
बेळगावमध्ये भात कापणीचे प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव
बेळगाव : बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हाळेनट्टी गावात शेतात भात कापणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भात कापणीचा अनुभवही घेतला.
हा संपूर्ण उपक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सेंद्रिय शेतीचे प्रणेते शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. भात कापणी कशी करतात याचे प्रात्यक्षिक दाखवल्या नंतर विद्यार्थ्यांनी हातात विळा घेऊन भात कापणीचा अनुभव घेतला. पेरणीच्या मोसमात याच विद्यार्थ्यांनी भात रोप लागवड करण्याचा अनुभव घेतला होता. सौर पॅनेल उर्जेद्वारे विहिरीतून गट शेतीसाठी पाण्याचे नियोजन (ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर) कसे केले जाते याचीही माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. सेंद्रिय पीक पद्धतीचे फायदे याविषयी शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकासमाधान केले. यावेळी मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे शिक्षक नीला आपटे, रुपाली हळदणकर, कांचन बाळेकुंद्री, अनुज बाळेकुंद्री आणि आयुष बाळेकुंद्री उपस्थित होते. यावेळी म्हाळेंनट्टी गावातील शेतकरी राहुल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना माहिती दिली.