एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra News Updates 12 October 2022 : मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 12 October 2022 : मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  

मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक  

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे.  

नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी
 
2016 साली झालेल्या नोटा बंदी विरोधाल्या याचिकेवर खंडपीठा पुढे सुनावणी होणार आहे. आज खंडपीठ हे ठरवले कि खरच आता हा विषय ऐकण्याची गरज आहे कि नाही.

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव 2022 महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. याचं उद्घाटन सकाळी 10 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला अभिनेता निखील वैरागर आणि सिने अभिनेत्री मोनालिसा बागल उपस्थित राहणार आहेत.

धुळ्यात गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता. 

दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक 

आज सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत गहू आणि रब्बी पिकांची एफआरपी ठरवली जाण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाची एफआरपी 2015 रूपये इतकी आहे. 

उधमपूर येथे एअर शो 

जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील हवाई दलाला 60 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उधमपूर, जम्मू येथील एअर फोर्स स्टेशन येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने उधमपूर एअर स्टेशनवर एअर शो आयोजित केला जाईल, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेची सर्व आधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होतील.  

 धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या  आव्हान देणाऱ्या याचिकांवर  सुनावणी 

सर्व धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचा दर्जा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या पवित्र स्थळांवर परकीय आक्रमकांनी बळजबरीने मशीद बांधली होती, त्या ठिकाणांवर तो हक्क सांगू शकला नाही. यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून  14 ऑक्टोबरपर्यंत आसाम आणि त्रिपुराच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 14 ऑक्टोबर या कालावधीत त्रिपुरा आणि आसामला भेट देणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू आज आगरतळा येथील नरसिंगगड येथे त्रिपुरा राज्य न्यायिक अकादमीचे उद्घाटन करतील आणि त्रिपुरा राष्ट्रीय कायदा विद्यापीठाची पायाभरणी करतील.

18:18 PM (IST)  •  12 Oct 2022

पालघरमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  

Palghar Rain : मागील तीन ते चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळे संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलय. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडलाय. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतोय की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 

18:15 PM (IST)  •  12 Oct 2022

 शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शिवसेनेने रोखला राष्ट्रीय महामार्ग 

Nagpur News : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ त्यांच्या खात्यात मदत जमा करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा या मागणीसाठी तब्बल दीड तास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावी, पीक विम्याच्या नुकसानीची पाहणी करुन तत्काळ मदत देण्यात यावी. नियमीत शेतकरी पीक कर्जदारांना शासनाचे प्रोत्साहन पर 50 हजार अनुदान त्वरीत देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.  दरम्यान आंदोलनामुळे जवळपास पाच किलोमीटरवर वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी मशाल हाती घेऊन आंदोलन करण्यात आले. 

18:07 PM (IST)  •  12 Oct 2022

Palghar Rain : पालघरमध्ये परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी, शेतकरी अडचणीत

मागील तीन ते चार दिवसापासून पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार अशी हजेरी लावली असून या परतीच्या पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळे संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. त्यामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडला आहे. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतोय की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत.

16:48 PM (IST)  •  12 Oct 2022

मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या शिवसैनिकांची चौकशी सुरू

मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची चौकशी केली जात आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलिस ठाण्यात पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलांवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेली प्रतिज्ञापत्र खरी की खोटी याची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल जाले आहेत. 

16:46 PM (IST)  •  12 Oct 2022

रायगड जिल्ह्यातील रोहा, उरण परिसरात पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यातील रोहा आणि उरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रोहा परिसरात परतीच्या पावसाची हजेरी लावली असून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget