एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 10th January 2023 : Shiv Sena: विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्यास हरकत नाही; शिंदे गटाचा दावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 10th January 2023 : Shiv Sena: विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण  निवडणूक चिन्ह देण्यास हरकत नाही; शिंदे गटाचा दावा

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

10 January Headlines : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी  11 वाजता सुनावणी होणार आहे. याबरोबरच शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवाय आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे.  याबरोबरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे.  

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सकाळी  11 वाजता सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टाकडे केलीये. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णमुरारी, न्या. हिमा कोहली, न्या.पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.  

शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगत सुनावणी 

ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? यावर निवडणूक आयोगासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहे. त्यामुळं आता पक्षावर हक्क कोणत्या गटाचा असणार, याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. 

आज वर्षातली पहिली आणि शेवटची अंगारकी चतुर्थी

 मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे रहातात. अंगारकी चतुर्थी निमित्त सिद्धीविनायकाचे दर्श घेण्यासाठी मुंबईज्या आसपारच्या परिसरातून लोक येत असतात. 

 राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडेल या बैठकीमध्ये आगामी विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चा करण्यात येईल. सध्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षक मतदार संघासाठी बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अमरावती आणि नागपूरच्या जागांचे उमेदवार ठरलेले नाहीत. 

नागपुरात  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होणार आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच. के. पाटील, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित रहाणार आहेत. 

मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर डोळ्याचे ऑपरेशन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात एका डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. यासाठी शरद पवार सकाळी रुग्णालयात दाखल होणार आहे. 

 जोशीमठवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी

 उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याप्रकरणी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. या याचिकेत प्रभावित क्षेत्रात लोकांना अर्थ सहाय्य, संपत्तीचा विमा उतरवण्याची मागणी करण्यात आलीये.यावर आज सुनावणी होणार आहे. 

पुण्यात 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात
 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.  

23:24 PM (IST)  •  10 Jan 2023

पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपतीला घातला स्वेटर

पुण्यामधील प्रसिद्ध असलेल्या सारसबाग गणपतीला स्वेटर घालण्यात आला आहे.

20:58 PM (IST)  •  10 Jan 2023

Railway News: डहाणू-वाणगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डहाणू-वाणगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत  झाली आहे. डाऊन आणि अप मार्गावरील लांब पल्याच्या गाड्या पालघर , बोईसर , डहाणू , वाणगाव रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने तर अप मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जवळपास एक तासाने गाड्या उशिराने धावत असून रात्री 8.25 वाजण्याच्या सुमाराम दोन्ही बाजूची वाहतूक सुरू झाली असून, रेल्वे वाहतूक एक तास उशिराने धावत आहे. 

19:49 PM (IST)  •  10 Jan 2023

गौतम अदानी राज ठाकरे यांच्या भेटीला

उद्योगपती गौतम अदानी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

19:37 PM (IST)  •  10 Jan 2023

Crime News: कंटेंनरसह 75 लाखांचा गुटखा जप्त, देवदरी घाटात वडकी पोलिसांची कारवाई

दिल्ली टू बेंगलोर जात असलेला गुटख्याचा कंटेनर पकडण्यात यवतमाळच्या वडकी पोलिसांना यश आले. यामध्ये विविध कंपन्यांचा तब्बल 39 लाख सहा हजाराचा गुटखा व कंटेनर असा एकूण 75 लाख 6 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई वडकी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या देवदरी घाटात करण्यात आली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget