Maharashtra News Updates 09 November 2022 : Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होणार नाहीत; सूत्रांची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
देशाचे सरन्यायाधीस उदय लळीत आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. तसेच आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील दुसरा दिवस असणार आहे. त्याचसोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार
न्या. धनंजय चंद्रचूड आज भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी होईल. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. न्या. चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा दिवस
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. आज ही यात्रा सकाळी सहा वाजता रामतीर्थ, बिलोली येथील शंकर नगर येथून सुरु होणार आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील वजीरगांव फाटा येथे रात्री विश्रांतीसाठी थांबणार आहे.
संजय राऊतांना जेल की बेल?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट त्याचा राखून ठेवलेला फैसला जाहीर करणार आहे. तपासयंत्रणेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला आहे. तर संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीही संपत असल्यानं त्यांनाही आज कोर्टापुढे हजर केलं जाईल.
अनिल देशमुखांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर सादर करणार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर सीबीआय आपलं उत्तर आज हायकोर्टात सादर करणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. सीबीआयच्या याच एफआयआरवरून ईडीनं दाखल केलेल्या ईसीआयआरमध्ये हायकोर्टानं दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतरही सीबीआय कोर्टानं देशमुखांना जामीन नाकारणं अयोग्य असल्याचा देशमुखांच्यावतीनं हायकोर्टात दावा करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांचा सोलापूर दौरा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ते सांगोल्यातील संगेवाडी आणि मांजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर आदित्य ठाकरे महूद मार्गे जेजुरीला जातील.
वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर, आदर्श आचार संहिता लागू
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायतीतील सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून दि.23 डिसेंबर पर्यंत आचार संहिता लागू राहणार आहे.
18 नोव्हेंबर रोजी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द होईल. दि.28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करण्यात येईल. दि.5 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार आहे. दि.7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी 3 वाजता नंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजता आवश्यकता असल्यास मतदान घेण्यात येईल. दि.20 डिसेंबर रोजी मतमोजनी व निकाल घोषित करण्यात येईल. दि.23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.
गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जोडी (एक नर व एक मादी ) आता नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.
एमपीएससीच्या मुंबईतल्या कार्यालयाच्या बांधकामाला अखेर मंजुरी
Beed News : असमाधानकारक कामाचं कारण सांगून बीड मधील तीस आरोग्यसेविकाना कामावरून केलं कमी
Beed News : राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये 3200 आरोग्य सेविकांच्या पदभरतीला मान्यता देण्यात आली होती मात्र त्यामध्ये 597 पदांना अद्याप देखील मंजुरी देण्यात आली नसून बीड जिल्ह्यातील तीस आरोग्य सेविकांना कामावरून कमी करण्यात आला आहे.. वेगवेगळ्या आरोग्य उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या या आरोग्य सेविकांना त्या ठिकाणी डिलिव्हरी वार्ड नसल्याचे कारण सांगून कामावरून कमी केल्याने आरोग्य सेविकांनी संताप व्यक्त केलाय.
केरळ सरकारचा राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा निर्णय
केरळ सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांना कुलपती पदावरून हटवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा निर्णय घेतला आहे. कुलपतींच्या जागी तज्ज्ञ आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळत आहे.
Kerala cabinet has decided to bring in an ordinance to remove Governor from the post of Chancellor. Planning to bring in an expert in place of the Chancellor. More details awaited.
— ANI (@ANI) November 9, 2022