Maharashtra News Updates 03 November 2022 : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
विधानसभेच्या '166-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस
संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यामुळे संभाजी भिडे वादात सापडले आहेत. त्यांना या वक्तव्यानंतर महिला आयोगानं नोटीस देखील बजावली असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.
भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू नाही? गँम्बिया सरकारचा यू-टर्न
गँबियात (Gambia) कफ सिरपच्या (Cough syrup) सेवनामुळे 66 मुलांना आपला जीव गमवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याप्रकरणी भारतामधील कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीवर आरोप जाले होते. आता याप्रकरणात गँबिया सरकारनं यु टर्न घेतला आहे. भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं गँबिया सरकारनं सांगितलं आहे. गँबियातील मेडिसिन कंट्रोल एजन्सीनं रॉयटर्सला ही माहिती दिली आहे.
गेल्या महिन्यातील असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, गँबियाचे हेल्थ डायरेक्टर मुस्तफा बिट्टाये यांनी मुलांचा मृत्यू हा किडनीच्या आजारामुळे झाल्याचं सांगितलं होतं. सुत्रांच्या मते, भारताने या प्रकरणाच्या सिरपला मंजुरी देण्यावरुन गँबिया सरकारच्या नियमांवर बोट ठेवलं होतं. भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 66 मुलांचा मृत्यूचा उलगडा पोस्ट मार्टममध्ये झाला आहे. त्यामधून असं समोर आलेय की, 66 मुलांना ई-कोलाई आणि डायरिया झाला होता. तर त्यांना कफ सिरप का दिलं.
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख सदस्यत्वाचे अर्ज दाखल
शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत.
ठाकरे गटाने याआधी साडेआठ लाख आणि आज अडीच लाख सदस्यत्व अर्ज दाखल केले आहेत. सोबत एकूण 2 लाख 62 हजार शपथपत्र देण्याचा इरादा आहे. त्यापैकी आतापर्यंत 70 हजार शपथ पत्र दाखल करण्यात आली आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट, दोन्हीकडूनही आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात येत आहेत. मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.
उद्योगपती अविनाश भोसले सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल
उद्योगपती अविनाश भोसले सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल
न्यायालयीन कोठडीत असलेल्या अविनाश भोसले यांना झाली कोरोनाची लागण..
न्यायालयाच्या आदेशानुसार 10 दिवसांपूर्वी भोसले यांना नियमित तपासणीसाठी नेण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
अविनाश भोसले यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात कोव्हिड झाल्याने दाखल करण्यात आलय.
भोसले यांना आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने केली आहे अटक.
सामाजिक न्याय विभागाच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली
सामाजिक न्याय विभागाच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली
सन 2022 आणि 23 पूर्वीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्या कामांच्या संदर्भात पालकमंत्री निर्णय घेणार
त्यामुळे स्थगिती जरी उठवली असली तरी कोणती काम मान्य करायची किंवा कोणती रद्द करायची हे पालकमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार
शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात घेतलेल्या कामांना दिली होती स्थगीती
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक
Nashik crime : नाशिकमध्ये भरदिवसा जबरी दरोडा, एसबीआय बँक आवारातून 17 लाख लांबवले
Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात भरदिवसा लुटीची घटना घडली असून तब्बल 17 लाख रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे. एसबीआय बँकेच्या आवारात ही घटना घडली असून कॅमेऱ्यात कैद झाली आहे.