Maharashtra News Updates 02 December 2022 : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये; मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Private Schools fees: खासगी शिक्षण संस्थामधील 'फी'ला लगाम, राज्य सरकार ठेवणार वॉच
Private Schools fees: राज्यातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर लगाम लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ( Higher & Technical Education Department ) वॉच राहणार आहे. खासगी संस्थांकडून केले जाणारे प्रवेश आणि घेतली जाणारी भरमसाठ फी यावर या विभागाचं विशेष लक्ष असणार आहे.
राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण शुल्क नियंत्रण (FRA) प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र पुढील काळात या एफआरएकडून पारदर्शी कारभार होतो की नाही, याच्या पडताळणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ही यावर वॉच ठेवला जाणार आहे. एफआरएकडून शुल्क ठरविण्यात आलेल्या राज्यातील शिक्षण संस्थांपैकी कोणत्याही 10 संस्थांचे ऑडिट उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांतील प्रवेश आणि शुल्क यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या एफआरए वरही लक्ष ठेवले जाणार आहे. एफआरएकडून संस्थांचे शुल्क ठरविताना नियमांनुसार ठरवले गेले का? कोणास वाढीव शुल्काची शिथिलता देण्यात आली का? किती संस्थांनी कसे आणि किती शुल्क वाढविले ? या सगळ्याचा आढावा पुढील शैक्षणिक वर्षापसून घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरीकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा; हायकोर्टात जनहित याचिका
मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai Local News) असलेल्या उपनगरीय लोकलमध्ये दिव्यांगाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करावा, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या वकिलाकडून ही जनहित याचिका केली गेली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. के. पी. नायर जे पूर्वी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबईतील लोकलमधून प्रवास करताना ऐन गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते याकडे नायर यांनी याचिकेतून लक्ष वेधलेलं आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपनगरीय लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याच्या मागणीसंदर्भात 9 ऑगस्ट 2019 रोजी आपण तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनाही निवेदन दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सार्वजनिक तक्रार कक्षानं त्याची एक प्रत रेल्वे प्रशासनाकडेही पाठवली होती. त्यावर 2 जानेवारी 2020 रोजी रेल्वेनं प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करणे शक्य नसल्याचं कळवलेल आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी ही याचिका दाखल केल्याचंही नायर यांनी याचिकेत नमूद केलेलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका
मविआच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती
संबंधित कामांचं बजेट मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामं थांबवता येणार नाहीत - हायकोर्ट
महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) निघालेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती दिली होती
मात्र राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला हायकोर्टानं आज स्थगिती दिलीय
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामविकास विभागाने 19 जुलै आणि 25 जुलै रोजी मविआ काळात मंजूर झालेली तसंच वर्क ऑर्डर निघालेल्या कामांनाही थेट स्थगिती दिली होती
1 एप्रिल 2021 पासून मंजूर झालेली हजारो कोटींची काम यामुळे रखडणार होती
या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी हायकोर्टात दाद मागितली होती
12 डिसेंबर रोजी याप्रकरणी हायकोर्टात पुढील सुनावणी होईल
यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात लागला विजेचा शॉक
यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात लागला शॉक,, विजेचा शॉक लागण्याने महिलेची प्रकृती गंभीर , निशा आनंद इंगोले असे जखमी महिलेचे नाव , दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिला तपासणी साठी गेली होती तिथं असलेल्या एका पाईप मध्ये विजेचा करंट होता त्या पाईपच्या आधाराने महिला चालत असताना एकदम विजेचा धक्का महिलेला लागला असून ती जागीच कोसळली, तिला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
राजकारणात अजातशत्रू कसा असावं याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी - नाना पाटेकर
नागपुरात आज खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन पार पडलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सहावे वर्ष असून सांस्कृतिक मेजवानी नागपूरकरांसाठी आयोजित केली जात आहेत. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. 'हा महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं एक ठिकाण असल्याचे अभिनेता नाना पाटेकर यावेळी म्हणालेत. राजकारणात अजातशत्रू कसा असावं याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी असल्याचे' गौरवोद्गार नाना पाटेकर यांनी काढले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील एक हजार स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ४ डिसेंबरला पाहणी दौरा
नागपूर ते शिर्डी महामार्गाची करणार पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला करणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन
मुंबई आयआयटी प्लेसमेंट सिजनला सुरवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स
मुंबई आयआयटी प्लेसमेंट सिजनला सुरवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स
या प्लेसमेंट सीझनमध्ये देशातील आणि देशाबाहेरील 300 कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे
या प्लेसमेंट सीजन ची सुरुवात सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे पहिल्याच दिवशी 300 प्रीप्लेसमेंट ऑफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आला त्यातील 194 ऑफर्सचा विद्यार्थ्यांनी स्वीकार केला
तर पहिल्या दिवशी एकूण अडीचशे जॉब ऑफर्स पैकी 175 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत
प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी एकूण 46 कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या
एक्सेंचर सोल्युशन ,एअरबस इंडिया मायक्रोसॉफ्ट इंडिया मॉर्गन स्टॅन्ली, क्वालकॉम, शेल इंडिया, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, टाटा स्टील या कंपनीचा पहिल्या दिवशीच्या प्लेसमेंट सीजन मध्ये सहभाग होता