एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 5th March 2023 : Mumbai Light: मुंबईतील प्रभादेवी परिसरातील लाईट गेल्या 10 मिनीटांपासून गायब

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 5th March 2023 : Mumbai Light: मुंबईतील प्रभादेवी परिसरातील लाईट गेल्या 10 मिनीटांपासून गायब

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा खेडमध्ये रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. यावेळी काहींचे पक्ष प्रवेश देखील होणार आहेत. तर, दुसरीकडे मुंबईत भाजप- आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. जाणून घ्या आज दिवसभरातील घटना...

रत्नगिरी 

- खेडच्या गोळीबार मैदानात संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचाही ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदमदेखील पक्षात प्रवेश करणार आहेत.

नागपूर

 - आज उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई एक पेन्शन मार्च निघणार आहे. जुनी पेन्शन या मुद्द्यावर नव्याने निवडून आलेले काँग्रेस आमदार सुधाकर अडबाले हे या मोर्चामध्ये सहभागी होणार.

- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागच्या 13 दिवसापासून सुरु असलेले विदर्भात फिरत असलेले विदर्भ निर्माण यात्रा आज नागपूरात पोहचणार. एक यात्रा गडचिरोलीच्या कालेश्वर व एक यात्रा बुलढाण्याच्या सिंदखेडराजा येथून निघाल्या होत्या. दोन्ही एकत्र येऊन संविधान चौकात त्याचा समारोप होणार आहे.

मुंबई 

- अयोध्या वरून आणलेल्या धनुष्यबाणासह भाजप शिवसेना - शिंदे गट करणार मुंबई पूर्व उपनगरात शक्ती प्रदर्शन. सकाळी 9 वाजता सहा हजार बाईकसह घाटकोपर अमृतनगर सर्कल ते मुलुंड अशी भव्य आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार. 

पुणे 

- पुण्यात पहिल्यांदाच होत असलेल्या साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्याचे उद्घाटन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत उद्घाटन होणार  आहे.

- गॅस दरवाढीच्या विरोधात AAP आम आदमी पार्टीचं पुण्यातील बालगंधर्व चौकात सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येणार

सातारा 

- शरद पवार दौरा सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. रयत शिक्षण संस्थांच्या इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 

नवी मुंबई

-  सचिन धर्माधिकारी यांना (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ) डी. लिट पदवी प्रदान सोहळा नवी मुंबईत होत आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे संचालक सचिन धर्माधिकारी यांच्या पदवी प्रदान कार्यक्रम सकाळी 10 वाजता नवी मुंबईत पार पडत आहे. जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठ राजस्थान डी. लिट पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील मंत्री यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे.  

अमरावती

- आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येत आहेत. अमरावतीत 1 ते 5 मार्च दरम्यान कृषी विभागाकडून भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे. 

सांगली 

-  राज्यस्तरीय ओपन रायफल शुटिंग स्पर्धेचे आयोजन. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि शहिद अशोक कामटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ओपन रायफल शूटिंग स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर 

- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आजही सोलापूर शहरात आहेत. त्यांच्या उपस्थितीत आत्मा अंतर्गत कृषी महोत्सवचे उदघाटन होणार आहे.

परभणी 

- माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोनार समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लोणीकरही राहणार उपस्थित

जळगाव 

- जळगाव तालुक्यात वराड येथे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ होणार आहे.

22:35 PM (IST)  •  05 Mar 2023

Mumbai Light: मुंबईतील प्रभादेवी परिसरातील लाईट गेल्या 10 मिनीटांपासून गायब

एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असताना मुंबईतील प्रभादेवी परिसरातील वीज गेल्या 10 मिनीटांपासून गायब आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

16:08 PM (IST)  •  05 Mar 2023

Beed News : संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राचार्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Beed News : संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी वडवणीच्या एका प्राचार्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बीडमध्ये सुरू असलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवण्याचा प्रकार उघडकीस झाला होता आणि त्यानंतर वडवणी येथील एका संस्थेवर प्राचार्य असलेले शिवदास तोंडे यांनी परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रामध्ये विनापरवानगी प्रवेश केला त्यामुळे केंद्रप्रमुखांच्या तक्रारीवरून परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राचार्य शिवदास तोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

13:07 PM (IST)  •  05 Mar 2023

Shivsena BJP Ashirwad Yatra : मुंबईत ठाकरेंना भाजप आणि शिवसेनेचं आव्हान, अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन

उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे. मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा निघणार आहे. अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे. थोड्याच वेळात घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.

13:02 PM (IST)  •  05 Mar 2023

Coronavirus : होळीवर कोरोनाचं सावट! देशात 24 तासांत 324 नवीन कोरोना रुग्ण

ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा कोरोनाचं (Covid 19 Updates) संकट वाढत आहे. देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत असताना आता मात्र कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 324 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी 95 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 300 होती, आज हीच रुग्ण संख्या 324 वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 791 पर्यंत वाढली आहे.

12:50 PM (IST)  •  05 Mar 2023

Beed News : बीडच्या जिल्हा रुग्णालयात करता येणार बेरा तपासणी

Beed News : बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आता रुग्णांना बेरा तपासणी करता येणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते बेरा टेस्ट तपासणी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ज्यांना कानाने कमी ऐकू येतं अशा कर्णबधिर व्यक्तींसाठी, अतिशय महत्त्वाची समजली जाणारी बेरा टेस्ट तपासणी, ही बीड जिल्ह्यात केवळ अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयातच होत होती. मात्र, आता जिल्ह्यातील रुग्णांना अंबाजोगाईला जायची गरज नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयातच बेरा टेस्ट तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते या बेरा टेस्ट तपासणी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:   8 AM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaWalmik Karad Beed : सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला वाल्मिक कराड शरण येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मीक कराडवरील आर्थिक आणि मानसिक दबाव वाढवला, सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही
वाल्मीक कराडसमोर सरेंडर करण्याशिवाय पर्यायच उरला नाही, गेल्या 24 तासांत काय घडलं?
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!
Team India WTC Final Scenario : मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
मेलबर्न कसोटी हरली तर टीम इंडिया कशी जाणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरण
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
दिवसाढवळ्या ख्रिश्चन दफनभूमीत खून, चौकीदाराला भोसकलं, नागपुरमध्ये सलग दुसऱ्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
मोठी बातमी : महाराष्ट्र राज्याची 'आरोग्य व्यवस्था' धोक्यात? सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, डाॅक्टरांची 42 टक्के पदंही रिक्त
Astrology : आज सोमवती अमावस्येच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
आज सोमवती अमावस्येला जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींची होणार भरभराट, अचानक धनलाभाचे संकेत
Walmik Karad: मोठी बातमी: वाल्मीक कराड पोलिसांसमोर कधी सरेंडर होणार? महत्त्वाची अपडेट, बीडमध्ये घडामोडींना वेग
वाल्मीक कराड पोलिसांसमोर कधी सरेंडर होणार? महत्त्वाची अपडेट, बीडमध्ये घडामोडींना वेग
Maharashtra Weather: येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
येत्या 4-5 दिवसात राज्यात पुन्हा कोरड्या थंड वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार, किमान तापमान घटणार, 24 तासांत..
Embed widget